
काँग्रेस पक्षाचे तळागाळापर्यंत रुजविण्यासाठी जीवाचे रान करणार: पै.राजेश वाघोले
वडगाव मावळ:
मावळ तालुका युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी थुगाव येथील हर्षद बाळासाहेब वाघोले यांची, मावळ तालुका युवक काँग्रेस च्या तालुका सदस्य पदी दारुंब्रेतील धनंजय रामभाऊ कदम यांची ,तर तळेगाव शहर युवक काँग्रेस सदस्य पदी मतीन तांबोळी यांची निवड करण्यात आली.मावळ तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश वाघोले यांनी निवड केली.
मावळ तालुक्यातील ज्येष्ठ उद्योजक व काँग्रेस नेते रामदास काकडे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. उद्योजक रामदास काकडे यांनी सर्वाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.मागील काही दिवसांपासून मावळ तालुक्यात युवक काँग्रेस च्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून पक्ष संघटना बळकटीवर भर दिला असल्याचे दिसून येत आहे.
राज्याच्या राजकारणाचा तालुक्याच्या राजकीय घडामोडीवर परिणाम दिसतोय. मावळ तालुक्यातील युवक संघटना अॅक्टिव्ह मोड आहे. युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पै राजेश वाघोले यांच्या पुढाकारातून युवक काँग्रेस मध्ये जोरदार इनकमिंग होत असल्याचे दिसतेय. वाघोले यांनी एकीकडे पक्ष संघटनात्मक कामावर लक्ष केंद्रित केले असून सामाजिक उपक्रमावर भर दिला आहे.मागील महिन्यात ग्रामीण भागात संगणक वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
पक्ष संघटनेच्या बैठका होत असून वाघोले यांनी गावभेट दौ-यावर बर दिला आहे. तालुका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व उद्योजक रामदास काकडे ,मावळ तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश वाघोले,मावळ तालुका युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन राऊत व अन्य कार्यकर्त्याच्या उपस्थितीत या तिघांना निवडीचे पत्र देण्यात आले. निवड झाल्यावर हर्षद वाघोले,धनंजय कदम,मतीन तांबोळी यांनी काँग्रेस पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वास दिला.
- धर्मासाठी मृत्यूला कवटाळून संभाजीमहाराज अमर झाले: डॉ. केदार फाळके
- जगताना विवेक खूप महत्त्वाचा असतो!’ – प्रा. डाॅ. वर्षा तोडमल
- बीना इंग्लिश स्कूलच्या वतीने काश्मीरमधील मृतांना श्रद्धांजली
- नफ्यातून समाजोपयोगी उपक्रम घेणाऱ्या काळोखे पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद : सर्जेराव कांदळकर
- गोडुंब्रे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सुकन्या रितेश चोरघे बिनविरोधडीजे,डॉल्बी आणि ढोलताशांच्या दणदणाटाला फाटा : किर्तन सोहळ्याचे आयोजन
वाढवण्यासाठी मावळात झंझावात सुरू ठेवणार आहे.




