कामशेतला प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचे उद्घाटन
कामशेत:
कामशेत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बाळकृष्ण राठी यांच्या दुकानात ” किसान समृद्धी केंद्राचे ” उद्घाटन आज भाजपा जेष्ठ नेते माऊली शिंदे ,मा.सभापती संतोष कुंभार , सरचिटणीस हरिभाऊ दळवी यांच्या हस्ते करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले असून देशात २ लाख ८ हजार तर महाराष्ट्र मध्ये १४ हजार वरून अधिक, पुणे जिल्ह्यामध्ये ६५० पेक्षा जास्त तर मावळ तालुक्यात जवळपास ५० केंद्राचा समावेश यामध्ये आहे.
या वेळी मा.सभापती राजाराम शिंदे,धनगर परिषद अध्यक्ष नामदेव शेडगे,भाजपा नेते अतुल कार्ले,संचालक बाळासाहेब गायखे,कामशेत उपाध्यक्ष रमेश बच्चे ,ह.भ.प.सुरेश इंगुळकर ,ज्ञानेश्वर लालगुडे,सिताराम काजळे,कामशेत सोशल मिडीया अध्यक्ष मानस गुरव, रुपेश सुतार दुकानदार बाळकृष्ण राठी ,लखन राठी उपस्थित होते.
कुसगाव खुर्दच्या नवनियुक्त सरपंचपदी मनिषा लालगुडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे कामशेत शहर भाजपा वतीने सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मावळ विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यु शिंदे व आभार भाजपा शहर युवा मोर्चा अध्यक्ष प्रवीण शिंदे यांनी केले.
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस