वडगांव मावळ:
येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या नगरपंचायतीच्या इमारतीस पराक्रमवीर श्रीमंत सरदार महादजी शिंदे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी माजी उपनगराध्यक्षा व विरोधीपक्ष नेत्या अर्चना संतोष म्हाळसकर यांनी केली आहे.

म्हाळसकर यांनी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी यांना या आशयाचे निवेदन देऊन ही मागणी केली आहे. म्हाळसकर यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की,” वडगाव नगरपंचायतची स्थापना होऊन पाच वर्षे होऊन गेली. ग्रामपंचायतचे रुपांतर वडगाव नगरपंचायत मध्ये होत असताना नविन इमारत ही जवळ जवळ बांधुन झाली आहे.

वडगाव शहराला स्वतंत्र असा इतिहास आहे. तो म्हणजे द ग्रेट मराठा श्रीमंत सरदार श्री.महादजी शिंदे यांचा त्यांनी १४ जानेवारी १७७९ या दिवशी वडगाव मावळची इंग्रजाविरुद्धची ऐतिहासिक लढाई जिंकून वडगाव मावळसाठी अजरामर असा इतिहास घडवला आहे.

अशा पराक्रमवीर श्रीमंत सरदार महादजी शिंदे यांचे नाव नव्याने  बांधण्यात आलेल्या नगरपंचायतीस देण्यात यावे ही सर्व भाजपा नगरसेवकांच्या वतीने विनंती करण्यात येत आह. तसेच श्रीमंत सरदार महादजी शिंदे यांचा एक माहीती आलेखाचा एक स्वतंत्र असा दीपस्तंभ देखील नगरपंचायत परिसरांत नव्याने करावा.

श्रीमंत सरदार महादजी शिंदे या नावाने वडगाव नगरपंचायतीस नाव देऊन त्यांची पराक्रमाची शौर्यगाथा पिढ्यानपिढे चालु राहील हीच यामागील मुख्य धारणा असल्याचे या पत्रात म्हटले आहे, वैचारिक,राजकीय व सामाजिक अशा सर्व स्तरावर आघाडीवर असलेल्या व तालुक्याचे मुख्यालय असलेल्या शहरात ही मागणी पूर्णत्वास जाते की या वरून शहरात काही राजकीय घडामोडी घडतात हे पाहणे औचित्याचे ठरेल.

error: Content is protected !!