कामशेत:
माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कामशेत येथील डाॅ.विकेश मुथा यांच्या महावीर हाॅस्पिटल येथे २७ जुनला सर्व रोग निदान व मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महावीर हाॅस्पिटलचे सर्वेसर्वा डाॅ. विकेश मुथा यांनी दिली.
माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यंदा वाढदिवस साजरा करणार नाहीत.शिवसैनिकांनी मातोश्रीवर न येता सामाजिक उपक्रम राबवण्यात यावे असे आवाहन शिवसैनिकांना ठाकरे यांनी केले. याच पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणेच महावीर हाॅस्पिटल मध्ये सामाजिक बांधीलकी मानून आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
तसेच ठाकरे यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त ६२ रुग्णांवर सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.अपघातग्रस्त रुग्णांवर नियम व शर्तीनुसार उपचारात मोठी सवलत देण्यात येणार असल्याचे डॉ.मुथा यांनी सांगितले. व्याधी कोणतीही असो त्यावर सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया होणार आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यंदाच्या वाढदिवसाला सामाजिक उपक्रम राबविण्याचे आवाहन शिवसैनिकांना केले,याच आदेश शिरवंद्य मानून या उपक्रमाचे आयोजन होत आहे.शस्त्रक्रिया करू इच्छिणाऱ्यांनी आगाऊ नोंदणी करणे आवश्यक आहे.