करंजगावच्या सरपंचपदी वैशाली संदीप कुटे
कामशेत:
नाणे मावळातील करंजगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वैशाली संदीप कुटे यांची बिनविरोध निवड झाली.माजी सरपंच दिपाली साबळे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक घेण्यात आली.
यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून कामशेत मंडळ अधिकारी सुरेश जगताप, ग्रामसेवक चंद्रकांत मोरे, तलाठी प्रसाद भाडाळे यांनी काम पाहिले. यावेळी नवनिर्वाचित सरपंचांचा गावचे जेष्ठ नेते पांडुरंग उंडे, शिवाजीराव टाकवे,राजाराम साबळे,तानाजी पोटफोडे व माजी सरपंच दिपाली साबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी उपसरपंच महादू शेडगे,ग्रामपंचायत सदस्य व माजी नवनाथ ठाकर,कौशल्या पवार ,उज्ज्वला पोटफोडे, ममता गवारी,सुरेखा भगत व श्रीरंग गोडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.नवनिर्वाचित सरपंच कुटे यांनी जेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या सहकार्याने काम करणार असल्याचा ग्रामस्थांना विश्वास दिला.
ग्रामस्थांनी नवनिर्वाचित सरपंचांची भव्य मिरवणूक काढत आनंदोत्सव साजरा केला.
- काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन
- गणपतीदान व निर्माल्यदान उपक्रमाला भाविकांचा भरभरुन प्रतिसाद : १४८६० गणेश मुर्ती व ३२ टन निर्माल्य जमा
- माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्वामी कुवल्यानंद योग पुरस्कार प्रदान
- पर्व आरोग्य क्रांतीचे : आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मावळात महाआरोग्य शिबीर
- रविंद्र आप्पा भेगडे यांच्या झंझावाती गणेश मंडळ दौऱ्यांमुळे कार्यकर्त्यांचा गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित