तळेगाव स्टेशन:
प्रेरणेपासून निर्मितीपर्यंत २२१ कॉपीराइट दाखल करण्यासाठी                                                                    नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ  इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी ची यशोगाथा मांडण्यात आली आहे.

सर्जनशीलता आणि कल्पकतेच्या विलक्षण परिश्रमातुन, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीने कॉपीराईट दाखल करण्याचा नवा जागतिक विक्रम प्रस्थापित  करून एक उल्लेखनीय टप्पा गाठला आहे.

२९ जून २०२३ रोजी आषाढी-एकादशीच्या शुभ मुहूर्तावर या प्रतिष्ठित महाविद्यालयाने  एकाच दिवसात तब्बल २२१ कॉपीराईट यशस्वीरित्या दाखल केले. ज्याची विविध विद्या शाखांमधील ५०० हून अधिक अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची ” वर्ल्ड रिकॉर्ड्स इंडिया ” मध्ये नोंदणी झाली आहे, या उल्लेखनीय कामगिरीसाठी सर्वांनी योगदान दिले.

       बौद्धिक आणि रचनात्मकता संपदा वाढवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयाने  नाविन्य आणि मौलिकतेसाठी आपली बांधिलकी पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. त्यांच्या अतुलनीय उत्साहाने आणि सूक्ष्म नियोजनाने, संस्थेच्या प्राध्यापकांनी आणि विद्यार्थ्यांनी विद्यमान जागतिक विक्रम मोडण्याच्या आणि कॉपीराइट भरण्याच्या क्षेत्रात अमिट छाप सोडण्याच्या मोहिमेला सुरुवात केली आहे.
      
           संस्थचे अध्यक्ष, माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे, उपाध्यक्ष  गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे,सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार राजेश म्हस्के, विश्वस्त रामदास काकडे, विश्वस्त महेशभाई शहा, कार्यकारी संचालक डॉ गिरीश देसाई यांनी प्राचार्य डॉ. विलास देवतारे, निबंधक विजय शिर्के,  संशोधन आणि विकास समन्वयक प्रा. प्रितम आहिरे, सर्व विभागप्रमुख डॉ. शेखर रहाणे, डॉ. नितीन धवस, डॉ. सौरभ सावजी, डॉ. सतीश मोरे, प्रा. आशिष मानवतकर तसेच प्राध्यापक समन्वयक प्रा. रोहिणी हंचाटे, प्रा. हर्षल चौधरी, सर्व विद्यार्थी, कर्मचारी, तसेच संपूर्ण एनएमआयईटी टीमचे एका दिवसात यशस्वीरीत्या “वर्ल्ड रिकॉर्ड्स इंडिया” मधे २२१ कॉपीराइट्स करण्याच्या उल्लेखनीय कामगिरीबद्द्ल कौतुक केले.

error: Content is protected !!