तळेगाव स्टेशन:
अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया या विषयावर विद्यार्थ्यांना मिळाले मार्गदर्शन आहे. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक संचालित नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी मध्ये बारावीची परिक्षा उत्तीर्ण झालेल्या आणि अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या  विद्यार्थ्यांसाठी “अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया” या विषयावर मार्गदर्शनपर चर्चासत्र नुकतेच पार पडले.

या चर्चासत्रास सुप्रसिद्ध करिअर मार्गदर्शक प्रा. विवेक डोके म्हणून वक्ते उपस्थित होते. या प्रसंगी नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास देवतारे, विभागप्रमुख डॉ. शेखर राहणे, डॉ. नितीन धवस आदी प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.

   विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म कट ऑफ मार्कनुसार कसा भरावयाचा असतो, आपल्या मेरिट नंबर नुसार पसंतीक्रम कसा द्यावा, कॉलेज पसंतीक्रम कसा ठरवायचं, बेस्ट अकॅडमिकस व जास्तीत जास्त प्लेसमेंट देणारे कॉलेज कसे निवडायचे आदी विषयांवर प्रा. डोके यांनी मार्गदर्शन केले. संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्हातील सुमारे ८५० विद्यार्थ्यांनी या व्याख्यानाचा लाभ घेतला. तसेच इतर राज्यातील विद्यार्थ्यांनी देखील सहभाग झाले. 
  
      कार्यक्रमाची प्रस्तावना, सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. शंकरराव उगले यांनी केले. तर कार्यक्रमाचे नियोजन प्रीती घुले, प्रा. विशालसिंग राजपूत, प्रा. कीर्ती टकले यांनी केले.

error: Content is protected !!