मुंबई:
रेड स्वस्तिक ऑफ इंडिया व छत्रपती शिवाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी लोकनेते शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांची सिल्व्हर ओकवर भेट घेतली. ही आनंददायी सदिच्छा भेट झाल्याची भावना रेड स्वास्तिक ऑफ इंडिया च्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस भास्करराव काळे मेहकर, रेड स्वस्तिक ऑफ इंडिया व छत्रपती शिवाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी या दोन्हीही संस्था करीत असलेल्या कामकाजाची माहिती पवार व सुळे यांना दिली. राज्यभर सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या छत्रपती शिवाजी ब्रिगेड सह रेड स्वस्तिक ऑफ इंडिया च्या कार्याचे पवारांनी कौतुक केले.

सामाजिक उपक्रमांसाठी सहकार्य लाभल्यास निश्चितपणे करू असेही पवार यांनी आश्वासित केले. खासदार  सुप्रिया सुळे यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या मुंबई कार्यालयात बैठक झाली. यावेळी  सुप्रिया सुळे यांनी या  दोन्ही संस्थांच्या सामाजिक कार्याची आस्थेने माहिती घेऊन याबाबत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान समवेत सामाजिक उपक्रम राबविण्याचे सुतोवाच केले.

सुळे यांचे स्विय सहाय्यक जेष्ठ पत्रकार दत्ता बाळसराफ, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिप्ती नाखले  छत्रपती शिवाजी ब्रिगेड व  रेड स्वस्तिक सोसायटीचे मार्गदर्शक  भास्करराव काळे ,छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे संस्थापक रेड स्वस्तिक ऑफ इंडियाचे महाराष्ट्र सचिव अशोक शिंदे, प्रकल्प संचालक नंदू भाऊ रायगडे ,पुणे जिल्हा सचिव श सचिन भामरे ,पुणे जिल्ह्याचे कोषाध्यक्ष कमलेश राक्षे,        
संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र डेव्हलपमेंट फाउंडेशन

           ठाणे जिल्ह्याचे समन्वयक निलेश  पाटील  छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे ठाणे जिल्ह्याचे प्रमुख ज्ञानदीप पाटील ,सामाजिक कार्यकर्ते  अनिलराव शिंदे मेहकर उपस्थित होते.

या आनंददायी भेटीमुळे आणि पवार  आणि सुळे  यांनीआकेलेल्या मार्गदर्शनामुळे आम्हाला ऊर्जा मिळाली, असल्याचे  रेड स्वस्तिक ऑफ इंडियाचे कोषाध्यक्ष  कमलेश राक्षे यांनी सांगितले.

error: Content is protected !!