तळेगाव दाभाडे:
जीवनविद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र तळेगाव दाभाडे व महाराष्ट्र राज्य वन विभाग, वडगाव मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणाच्या अभियाना अंतर्गत  वन विभागाच्या राखीव जागेमध्ये वृक्षारोपण करण्यात  आले.

  तळेगाव एमआयडीसीतील आकुर्डी गावठाण, आंबी, मावळ येथे सुमारे १३०० सागाच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले, जीवनविद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र तळेगाव दाभाडे चे अनुयायी व इतर असे ५७ जण यामध्ये सहभागी होते.
 
उपक्रमाकरता  जीवनविद्या मिशन तळेगाव दाभाडेच्या अध्यक्षा  नीता देशपांडे, सचिव डॉ. शेखर रहाणे, शंकर कावडे, बाळाराम चव्हाण, शरद बोर्गे, डॉ. सोरटे, बाळासाहेब चव्हाण तसेच वन विभागाचे अधिकारी हिरेमठ, भुजबळ
, भाऊ थरकुडे उपस्थित होते.

error: Content is protected !!