साते:
येथील संकल्प सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने साते, मोहितेवाडी,आणि ब्राम्हणवाडी  येथील नागरिकांना  १००० झाडांचे वाटप  करण्यात आले. फुलझाडे आणि फळझाडांचे वाटप करून संकल्प सामाजिक संस्थेने सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला.

संस्थेच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला सरपंच गणेश   बोऱ्हाडे,माजीसरपंच संतोष शिंदे ग्रा.सदस्य ऋषीनाथ आगळमे ,संदिप शिंदे , नितीन मोरे,ज्योती आगळमे  माजी सरपंच मामू आगळमे ,माजीउपसरपंच एकनाथ येवले,नवजीवन पतसंस्थेचे संचालक उमेश शिंदे, रामदास आगळमे,सिध्दार्थ मोरे,आशिष शिंदे,युवा नेते मुकूंद आगळमे,राजु आगळमे ,निखिल येवले, बाळासाहेब आगळमे गोविंद आवटे, संतोष भुंडे,दिपक मोरे उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे नियोजन  संस्थेचे अध्यक्ष मारुती आगळमे कार्याध्यक्ष वदन आगळमे, उपाध्यक्ष शेखर गावडे ,सचिव मदन आगळमे , सहसचिव नितीन आवटे ,सहखजिनदार नितीन आगळमे ,प्रकाश भुंडे यांच्यासह अन्य जणांनी
केले.

संकल्प संस्थेचे अध्यक्ष मारूती आगळमे म्हणाले,” वृक्षारोपण काळाची गरज आहे,कधीकाळी समृद्ध असलेली वनराई सिमेंट क्राॅकीटच्या जंगलात हरवून चाली आहे,रोपांचे वाटप करून वृक्षारोपणास प्रोत्साहन देण्याचा हा  प्रयत्न आहे.

error: Content is protected !!