भोंडे हायस्कूल मध्ये पर्जन्यमापक यंत्राची स्थापना
लोणावळा:
येथील ॲड. बापूसाहेब भोंडे हायस्कूल या शाळेत विद्यार्थ्यांना होणार्या पावसाची नोंद कशाप्रकारे केली जाते याचे आकलन व्हावे म्हणून पुणे वेधशाळेचे ज्येष्ठ हवामान तज्ञ डॉक्टर जीवन प्रकाश कुलकर्णी यांनी हवामान विषयक मार्गदर्शन करत आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त पर्जन्यमापक यंत्राचे प्रात्यक्षिक दाखवून स्थापना केली.
सदर यंत्र डॉ.कुलकर्णी यांनी शाळेला पर्जन्यमापक भेट दिले. तसेच त्यांनी लिहिलेल्या हवामान दूत या ग्रंथांचे प्रकाशन शाळेतील वविद्यार्थ्यांच्या आणि संस्थेचे चेअरमन ॲड. माधवराव भोंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रथमत: मान्यवरांच्या दीपप्रज्वलन करण्यात आले विद्यालयाच्या शिक्षकांनी प्रार्थना व गीत सादर केले पर्यवेक्षिका माधवी थत्ते यांनी प्रास्ताविक करत पाहुण्यांचे स्वागत केले.
यावेळी शंतनू पेंढारकर ,अरविंद पिसोळकर ,विलास रबडे,संस्थेचे चेअरमन ॲड. माधवराव भोंडे ,कल्पना चावला स्पेस अकॅडमी चे डॉ संजय पुजारी ,संचालक आनंद नाईक ,संजीव वीर, विद्यालयाचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक अमोल साळवे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अंजुम शेख, माध्यमिक विभागाच्या उपमुख्याध्यापिका तृप्ती गव्हले, प्राथमिक विभागाच्या उपमुख्याध्यापिका स्मिता इंगळे, पर्यवेक्षिका माधवी थत्ते तसेच पुणे वेधशाळेच्या आजी-माजी १२ हवामान दूत शास्त्रज्ञांची टीम आणि विद्यार्थी व शिक्षक याप्रसंगी उपस्थित होते .
शास्त्रज्ञ शंतनू पेंढारकर यांनी आधुनिक हवामान स्टेशन याविषयी माहिती दिली तर अरविंद पिसोळकर यांनी ऍसिडिक रेन आणि विविध रंगांचे रसायनशास्त्र या विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेचविलास रबडे यांनी रेडिओ आणि रेडिओ स्टेशन याविषयी माहिती दिली आणि मोर्स कोड विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी विद्यार्थ्यांनी आपले प्रश्न विचारत आपल्या शंकांचे निरसन करवून घेतले.
ॲड. बापूसाहेब भोंडे विद्यालय यामध्ये कल्पना चावला स्पेस अकॅडमी लवकरच सुरू होत आहे यामध्ये लोणावळा परिसरासाठी आकाशवाणी केंद्र आणि हवामानाचा अंदाज केंद्र लवकरच सुरु केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस