लोणावळा:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ या कार्यक्रमाद्वारे भाजपाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. सेवा, दृढनिश्चय आणि देशभक्ती या मूलभूत मूल्यांची सांगड घालीत झालेला संवाद देशसेवेसाठी  समर्पित असल्याच्या भावना या संवादातून व्यक्त झाल्या.

भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्स्फूर्त पणे या संवादात सहभाग नोंदवला. भारतीय जनता पार्टीचे मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख तथा मावळ भाजपा अध्यक्ष रविंद्र भेगडे यांनी कुसगाववाडी येथे भारतीय जनता पार्टीच्या बूथ अध्यक्ष,शक्ती केंद्र प्रमुख आणि जेष्ठ पदाधिकारी व  कार्यकर्त्यांसह सहभागी होऊन पंतप्रधान मोदी यांचे विचार ऐकले.

माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ता गुंड,गणेश  धानिवले,महिला आघाडी अध्यक्षा सायली बोत्रे,कामगार आघाडी अध्यक्ष अमोल भेगडे, सरपंच ज्ञानेश्र्वर गुंड,शक्ती केंद्र प्रमुख मधुकर कडू,सचिन येवले,सिमा  आहेर, लहू गुंड, किसन गुंड,हरिभाऊ दळवी यांच्यासह कुसगाव आणि वाकसई गणातील बूथ अध्यक्ष आणि कार्यकर्ते उपस्थित होते. वडगाव मावळ येथील पक्ष कार्यालयात वडगाव शहरासह तालुक्यातील अन्य भागातील भाजपे कार्यकर्ते यात सहभागी झाले होते.माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे,माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर,नगरसेवक प्रविण चव्हाण,भाजपाचे शहर अध्यक्ष अनंता कुडे,माजी उपसरपंच सुधाकर ढोरे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!