वडगाव मावळ:
येथील पक्ष कार्यालयात झालेल्या  ‘मेरा बूथ सबसे मजबूत ‘या कार्यक्रमात माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या भाजपच्या आजी माजी पदाधिका-यांनी सहभाग घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ मधून यूट्यूब, ट्वीटर, फेसबुक, वर्चूअल रॅली  च्या माध्यमातून सर्व बूथ कार्यकर्त्यांची संवाद साधन्यात आला . या संवाद कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी”मेरा बूथ सबसे मजबूत” मोदी @ 9 बुध कार्यकर्ता संवाद.या विषयी मार्गदर्शन केले.

  वडगाव शहर तील सर्व बुथ मिळून किमान ५० च्या उपस्थितीने स्क्रीन लावून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, जिल्हा अध्यक्ष गणेशभेगडे, सरचिटणीस अविनाश बवरे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, युवा मोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, बाबुलाल गराडे, मधुकर वाघवले, वडगाव शहर भाजपाचे  अध्यक्ष अनंता कुडे, महिला अध्यक्षा धनश्री भोंडवे, युवा मोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे व सर्व नगरसेवक  व बुथ प्रमुख  कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत होते. कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने वडगाव पक्ष कार्यालयात पाहण्यात आला.

error: Content is protected !!