एकता प्रतिष्ठान यांच्या वतीने सभासदाना खते वाटप
डोणे:
येथील एकता प्रतिष्ठानच्या वतीने शेतकरी सभासदांना  खते वाटप करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब घारे यांनी दिली.

एकता प्रतिष्ठान डोणे यांच्या वतीने सर्व सभासद शेतकरी सदस्यांना वेगवेगळ्या खतांचे वाटप करून ती कोणत्या वेळी कशी वापरायची याची माहिती देण्यात आली. यात 145 गोणी वाटप केल्याची माहिती घारे यांनी दिली. दर वर्षी पावसाला सुरुवात झाल्यावर (दाड) भात रोप उगवून वरती आल्यावर शेतकऱ्यांना काही ना काही वाटप करण्यात येते यावर्षी सर्वानुमते खते वाटप करूयात असे  ठरल्याने हा कार्यक्रम घेतल्याचे समजते.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कोणत्या पिकाला  कोणती खते कोणत्या वेळी वापरायची याची जास्त माहिती नसते, शिवाय प्रत्येकजण माती परीक्षण करून खत टाकत नाही त्यामुळे पिकाला गरजेनुसार खत जाईलच असे सांगता येत नाही.  यावर्षी आम्ही खतांचा व आमच्या भागातील सामान्य मातीचा आभ्यास करून खत वाटप केले आहे जेणेकरून पिकाची गरज पूर्ण होईल शिवाय भविष्यात आणखी काही शेतीपूरक उपक्रम राबवण्याचे नियोजन आहे असेही घारे यांनी सांगितले.

यावर्षी वाटप केलेल्या  खतांमध्ये आर.सी.एफ.युरिया,जय किसान सम्राट,सुफला, आदी खतांचा समावेश आहे .  यावेळी  प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश कारके,उपाध्यक्ष रवींद्र काळभोर, सत्यवान घारे शेखर काळभोर  ,राहुल घारे,समीर खिलारे,सचिव मल्हारी खिलारे रणजीत खिलारे,विशाल कारके,सागर चांदेकर ,संदेश चांदेकर ,निलेश कारके ,विकास घारे,सोमनाथ खिलारी,खजिनदार विश्वास चांदेकर  ,वैभव कारके ,अल्पेश कारके उपस्थित होते.

error: Content is protected !!