सोमाटणे:
जागतिक अंमली पदार्थ व अवैध वाहतूक विरोधी दिनानिमित्त  ‘स्माईल सायक्लोथाॅन’चे आयोजन करण्यात आले.पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय येथे व्यसनमुक्तीची शपथ घेऊन कोपनर यांच्या हस्ते फ्लॅग होस्टिंग झाले. विविध घोषणा देत स्माईल सायक्लोथाॅनची सकाळी साडे सहा वाजता सुरूवात झाली.

NDRF,CRPF तसेच CRPF बटालियन २४२ चे जवान, विविध सायकल क्लब,पोलिस बांधव व नागरिक या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
‘ भारत माता की जय, जय भवानी जय शिवाजी’तसेच व्यसनांच्या विरोधात विविध घोषणा देत स्माईल व्यसनमुक्ती केंद्र,उर्से येथे या रॅलीची सांगता झाली.पूर्ण मार्गावर पाणी व थंड पेय यांची व्यवस्था करण्यात आली होती.

.या प्रसंगी गुन्हे शाखेचे प्रमुख  कोपनर,नार्कोटिक प्रमुख  पवार ,रोटरीचे अध्यक्ष फल्ले, स्माईलचे संचालक  हर्षल पंडित तसेच प्रमुख अतिथी म्हणून श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते  राहुल राणे उपस्थित होते.

समारोप कार्यक्रमाची गणेश पूजनाने सुरूवात झाली. विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.नशामुक्त भारत अभियानासाठी सर्वोतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन दिले.प्रत्येक सायकल स्वारास मेडल,टी शर्ट, प्रशस्तीपत्र, नाष्टा व दूध देण्यात आले.मान्यवरांचा सत्कार तुळशीचे रोप,शाल व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.

वंदे मातरम् गाऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो.प्रदिप टेकवडे यांनी उत्स्फूर्त शैलीत केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी वाॅव, हंटर व इतर सायकल क्लब,टेक्नोव्हेस कंपनी,साक्षी लॅब, ढमाले दुध, रोटरीयन्स या सर्वांचे सहकार्य लाभले तसेच स्माईलचे प्रणव देशमुख, राहुल केळकर, अनिल सावंत, नितीन नाटेकर, रोहन यादव, हर्षल जोशी, राहुल बोरूडे,अमर कुंभार,
मारूती कारके व प्रमोद महिषी यांचे सहकार्य लाभले. अमोल कुलकर्णी यांनी आभार मानले.

error: Content is protected !!