आळवीन मी जीवन संगीत..
होय मित्रांनो,
सिद्धार्थ गौतम बुद्धांना ज्यावेळी आत्म ज्ञान प्राप्त झालं त्यावेळी त्यांचे अनेक शिष्य तयार झालेत! त्यात एक भोगविलासाला कंटाळलेला राजाही सामील झाला! तो चोवीस तास मध्यपान करायचा.अनेक स्त्रियांचा उपभोग घ्यायचा.
शेवटी तो या सर्व गोष्टींना कंटाळला आणि त्या भोगाकडून त्यागाकडे वळला आणि बुद्धांच्या साधकात सामील झाला. पण तो आपल्या शरीराला इतके कष्ट द्यायला लागला की ते पाहून अनेक शिष्यांना वाटायला लागले की- कदाचित त्याचा त्यातच अंत होईल! म्हणून सर्व साधक त्याला बुद्धाकडे घेऊन गेले.
त्यांनी सर्व हकीकत बुद्धांना सांगितली! बुद्ध ज्ञानी होते त्यांनी क्षणात सर्व परिस्थिती जाणली आणि मग त्या राजाला उपदेश करायला सुरुवात केली! बुद्ध म्हणाले हे बघ राजा मला कळलं आहे की तू पूर्वी उत्तम सतार वाजवायचा! समजा सतारीच्या तारांना जास्त ताण दिला तर त्याच्यातून चांगला सुर निघेल का?
त्यावेळी तो राजा म्हणाला की महाराज त्या तारा निश्चितच तुटुन जातील! त्यावर बुद्धाने त्याला प्रति प्रश्न केला की हे राजन– समजा मी त्या तारा जर थोड्या जास्त सैल केल्या तर त्यातून चांगला सूर निघेल का? त्यावर राजा उत्तरला नाही महाराज उलट त्या बदसूर निर्माण करतील! त्यावर बुद्धांनी त्याला फार सुरेख उपदेश केला.
हे बघ वत्सा- आपलं प्रत्येकाचं आयुष्य हे सुद्धा सतारीच्या सुरावटी सारखं असतं! हे सतारवादन आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला सुरूच असतं! त्याच्या तारा म्हणजे आपलं वर्तन! आपला स्वभाव! याची जर एखादी तार सैल झाली तर त्या तारेतून सूर निघणारच नाही! आणि ती जर यदा कदाचित जास्त ताणली गेली तर ती सुर तर राहोच पण तुटण्याचीच जास्त शक्यता आहे.
म्हणूनच आयुष्याच्या या सतारीच्या तारांची आपल्याला नीट काळजी घेतली पाहिजे! तरच आपल्याला हवा तसा सुर त्यातून निर्माण करता येईल! शेवटी भगवानबुद्ध त्या राजाला म्हणतात की- आपल्या आयुष्यात आपण नेहमीच मध्यममार्ग स्वीकारायला हवा! नाहीतर केव्हाही आयुष्याची सुरावट ही बेसूर व्हायला वेळ लागणार नाही! हाच आपला चिंतनाचा आजचा विषय आहे!
(ला.डाॅ. शाळीग्राम भंडारी,तळेगाव दाभाडे)
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस