पिंपरी:
श्री.संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारक-यांची  मोफत आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने ही आरोग्यसेवा करण्यात आली.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीकृष्ण मंदिराजवळ निगडी येथे वारक-यांच्या सेवेसाठी ही मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन केले होते.या शिबीराचे उद्घाटन पिंपरी चिंचवड मनपा फ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त सिताराम बहुरे यांच्या हस्ते झाले.

या शिबीरात एकूण ६४५ वारक-यांची बी पी/शुगर/आॕक्सिजन लेवल/तपमान चेक केले.सर्दी,खोकला,ताप,थंडी,अंगदुखी यावर औषधे दिली.तसेच ४०० वारक-यांच्या हातापायांची मसाज करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते श्री रमेश बामणे यांनी सहकुटुंब मदत केली.

या शिबीरात वारक-यांची तपासणी करण्यासाठी डॉ.अरविंद वाकचौरे,डॉ मृणाल फोंडेकर,डॉ प्रिया नायर,डॉ शुभम मोळावडे,डॉ निरज पाटील यांनी मदत केली.सप्तश्रुंगी मेडीकल काळेवाडी,लक्ष्मी मेडीकल चिंचवड,सुश्रुत आयुर्वेद चिंचवड,महाविर हाॕस्पिटल कामशेत व सामाजिक कार्यकर्ते श मोहन पटाधारी यांनी औषधांसाठी मदत केली.

शिबीर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व देणगीदार सभासद, पिंपरी चिंचवड मनपा प्रशासन,निगडी पोलीस स्टेशन,निगडी वाहतुक विभाग यांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!