वडगाव मावळ: कान्हे गावची हद्दीत डोक्यात दगड मारून खूण केल्याची घटना घडली.
भागुजी बाबुराव काटकर वय ५४ रा. पारवडी ता. मावळ असे खूण झालेल्याचे नाव आहे.
वडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भागुजी काटकर हे कान्हे येथील महेंद्र कंपनीत काॅन्ट्रॅक्टमध्ये मजूरी करत दिवस पाळी रात्र पाळी करून ते घरच्या संसाराला हातभार लावता होते. शुक्रवारी सकाळी कान्हे गावच्या हद्दीत रेल्वे स्थानकाजवळ झाडा झुडूपाच्या गवतात ते मृत अवस्थेत पडलेले दिसले कोणीतरी अज्ञात आरोपींनी अज्ञात कारणावरून त्यांच्या डोक्यावर,कपाळावर, कानावर दगड मारून त्यांचा खूण करून त्यांना गवतात फेकून दिले घटनास्थळी लोणावळा विभागाचे पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक, पोलिस निरीक्षक विलास भोसले यांनी भेट दिली.
खूणाचा छडा लागेल. पोलिस निरीक्षक
हा खूण कशामुळे झाला आणि कोणी केला याबाबत पोलिसांची दोन पथके तयार करून चौकशी सुरू केली आहे लवकरच या खूणाचा तपास लावून आरोपीला जेरबंद करण्यात येईल असे पोलिस निरीक्षक विलास भोसले यांनी सांगितले. काटकर यांच्या पश्चात पत्नी,चार मुली,एक मुलगा असा परिवार आहे. पारवडी पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.