तळेगांव दाभाडे : येथे संस्कृत संभाषण शिबिर संपन्न झाले.

संस्कृत भारती ही संस्था संस्कृत च्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी गेली अनेक वर्षे काम करत आहे हे काम विश्वव्यापी आणि देशव्यापी झाले आहे. हे सर्वविदित आहे.
शाळा शाळांमधून महाविद्यालयातून अनेक संस्थांमधून अनेक उपक्रम संस्कृत भारती द्वारे राबवले जातात.
संस्कृत भाषा ही जनसामान्यांची भाषा व्हावी हा उद्देश समोर ठेवून संस्कृत संभाषणाचे आयोजन केले जाते हे वर्ग पूर्णपणे निःशुल्क असतात.
नुकताच असाच एक संभाषण वर्ग तळेगाव-दाभाडे इथे गजानन महाराज मंदिराच्या परिसरात उदंड प्रतिसादात , आणि उत्साहात संपन्न झाला. या वर्गाला प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध लेखक , पत्रकार , कलावंत पं श्री सुरेश साखवळकर उपस्थित होते संस्कृत भाषेमध्ये अनेक ऋषी मुनींनी ज्ञान उपलब्ध करुन दिले आहे त्याचा उपयोग आपल्याला पूर्वीपासून आजतागायत होत आहे त्यानी ह्या भाषणामधून अनेक सुभाषितांचे दाखले देवून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
तर समारोप संस्कृत भारती महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष , कर्नल सतीश परांजपे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या वेळी गजानन महाराज मंदिराचे सचिव श्री सतीश भोपळे ही उपस्थित होते. तळेगाव मध्ये असे संस्कृत संभाषण २५ वर्ग चालवण्याचा संकल्प करण्यात आला या वर्गाला वयोवृद्ध ,लहान मोठे, स्त्री, पुरुष अशा सर्व स्तरातील लोकांनी सहभाग घेतला. या प्रसंगी गजानन महाराज मंदिराचे सचिव श्री सतीश भोपळे आणि श्री जयंत जोगवेकर उपस्थित होते. श्री जोगवेकर म्हणाले की , संस्कृत भाषेच्या अभ्यासाने आपसूकच इतर भाषां चा अभ्यास होण्यास मदत होते तसेच उच्चारण शुध्द होऊन मनाची एकाग्रता वाढते. ह्या समारोप प्रसंगी मुलांनी नाटक, गीतं , मनोगते इ सादर केले. प्रास्ताविक जिल्हा निमंत्रक सौ मंजूषा तेलंग केले , सौ ज्योती मुंगी आणि कु राजवी भोसेकर यांनी संचालन केले , तर सौ वसुधा साठे यांनी आभार मानले.
या संभाषण शिबिरासाठी सौ वसुधा साठ्ये , ज्योती मुंगी आणि मंजूषा तेलंग यांनी विशेष प्रयत्न केले.

error: Content is protected !!