त्यामध्ये शाळेने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली.कू. सिद्धी ढोरे ९१ % गुण मिळवून शाळेत प्रथम आली तर कु. चांदणी खानने 88.4 0% गुण मिळवून द्वितीय व सुरज मुखिया यांनी 85.20% मिळून तृतीय क्रमांक पटकाविला .
या यशामध्ये मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्ग यांचा मोठा सहभाग आहे. संस्थेचे संस्थापक श्री भगवान शेवकर, सौ सुजाता तोलानी नाईक , श्री कुमार सर , श्री सक्सेना सर यांनी प्राचार्य आणि शिक्षक वृंदाचे अभिनंदन केले . संस्थेच्या शंभर टक्के निकालाच्या परंपरेचा समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
अथक परिश्रमातून ग्रामीण भागामध्ये सीबीएससी सारखी संस्था स्थापन करून गाव आणि देशासाठी परिश्रम करणाऱ्या संस्थेचे समाजातील मान्यवरांकडून विशेष कौतुक केले जात आहे.
इंदोरी:
चैतन्य इंटरनॅशनल स्कूल( CBSE)इंदुरी, ने दहावीच्या शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली .
चैतन्य इंटरनॅशनल स्कूलचा इयत्ता दहावी (CBSE) बोर्डाचा निकाल दिनांक 12 मे रोजी जाहीर झाला.