कोथुर्णे येथे ६ मे रोजी मराठा आरक्षण मंथन परिषदग
पुणे :
मराठा क्रांती मोर्चाचा वतीने राज्य स्तरीय मराठा आरक्षण मंथन परिषद भैरवनाथ सभागृह मु. कोथुर्णे, पोस्ट. पवनानगर, ता. मावळ, जि. पुणे येथे दिनांक ०६ मे २०२३ रोजी सकाळी १०.३० ते ०५.०० वाजे दरम्यान होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळून लावली असल्या मुळे मराठा समाजात सभ्रम व निराशा निर्माण झाली असल्यामूळे या बैठकीत आरक्षण मिळण्यासाठी कायदेशीर व घटनात्मक मार्ग काय आहेत ? सर्वोच्च न्यायालयाच्या घटना पीठाने मराठा आरक्षण याचिकेवर निर्णय देताना काय अपेक्षा व्यक्त केल्या आहेत ?
आता आरक्षण नेमके कुठे व कसे अडले आहे? आरक्षण देण्याचा नेमका अधिकार राज्य शासनास आहे किंवा केंद्र शासनास आहे आदी आरक्षणा विषयी प्रश्न सर्वसामान्य समाज बांधवांच्या मनात निर्माण झाले असुन आता आरक्षण रद्द झाल्याच्या पार्श्वभुमीवर विवीध न्याय निवाडे, सर्वोच्च न्यायालयाचे विवीध निकालांचे दाखले आहेत काय ? आदी विषयांवर चर्चा व तज्ञ यांचे
सादरीकरण होणार असुन महाराष्ट्रातील विविध जिल्ह्याचे प्रतिनिधीनी या मंथन परिषदे साठी उपस्थित राहणार असुन सर्व सामान्य नागरीक व या विषयाशी अनुसरून कार्यरत असलेल्या विविध जिल्ह्यातील प्रतिनिधीं मोठ्या संख्येने उपस्थित राहणारआहेत.
भैरवनाथ सभागृह मु. कोथुर्णे, पोस्ट. पवनानगर, ता. मावळ, जि. पुणे येथे दिनांक ०६ मे २०२३ रोजी सकाळी १०.३० ते ०५.०० वाजे दरम्यान होणार असुन या महत्वपूर्ण राज्यव्यापी मराठा आरक्षण परिषदे साठी जिल्हा निहाय प्रतिनिधीनी उपस्थीत रहावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीन करण्यात आलेले आहे .
विनंती करण्यात आली आहे की, आरक्षणा साठीच्या या महत्वपूर्ण दिशादर्शक मंथन परिषदेस विविध जिल्ह्यातील सर्व संघटना व त्यांचे प्रतिनिधी, मराठा क्रांती मोर्चाचे प्रतिनिधि आदींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन सहकार्य करावे असेही संयोजन समितीचे राज्य समन्वयक संतोष दळवी व समस्त मराठा क्रांतीने मोर्चाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
- शिवराज पॅलेस ‘ बँक्वेट हाॅलचे सीता खंडू वायकर व खंडू आबाजी वायकर यांच्या हस्ते उद्घाटन
- महागाव येथे कालाष्टमी व श्री. काळभैरवनाथ जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
- इंदोरीत शनिवार दि.२३ नोव्हेंबरला समाजप्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख यांचे किर्तन
- रविवार, २४ नोव्हेंबर रोजी गझलपुष्पचा वर्धापनदिन सोहळा : रविंद्र भेगडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
- संपतराव पांडुरंग गराडे यांचे निधन