लपंडाव… सुख दुखांचा…
मित्रांनो…
मानवीजीवन कसं असत बघा?– आयुष्यभर– तो तहानभूक विसरून रात्रंदिवस कष्ट करून सुख प्राप्तीसाठी सारखा धावत असतो धावत असतो त्यामुळे होतं काय की तो शोध घेणाऱ्या सुखाचा आणि त्याच्या वाढणाऱ्या वयाचा सारखाच लपंडाव सुरू असतो!

         दुर्दैवाने त्याच्या सुखाचं आणि त्याच्या वयाच कधीच जमलं नाही!  कारण तो खूप कष्ट करून मेहनत करून ज्यावेळी तो सुखाला घरी घेऊन येतो त्यावेळी नेमकं त्याचं वय त्याच्यावर नाराज होऊन निघून गेलेलं असतं! आणि ज्यांच्या आयुष्यात या दोघांची गाठ एकत्र पडते ते मात्र खरोखरच भाग्यवंत ठरतात- असे फक्त दहा ते वीस टक्के असतात!
        
         यावर एकच उपाय आहे की- आपणच आपल्याजवळ नसलेल्या गोष्टीपेक्षा असलेल्या गोष्टीतच सुख मानायचं असत! कारण पूर्ण चंद्राची वाट बघता बघता आपलं सोन्यासारखं आयुष्य आपल्या हातातून केव्हा निसटून जातं हे आपल्यालाही कळत नाही!
        
         तसं पाहिलं तर चंद्रापेक्षाही  अर्धचंद्र सुद्धा अधिक सुंदर दिसू शकतो! फक्त ते  आपल्या मनाने स्वीकारल पाहिजे!
   यासाठी राजा विक्रमादित्याच्या आयुष्यातील गोष्ट फारच बोलकी आहे! प्रजेची मनापासून काळजी घेणाऱ्या राजा विक्रमादित्याची कीर्ती ऐकून एक साधू त्याला जंगलातील जंगली फळे रोज आणून द्यायचा!
  
राजा विक्रमादित्य मोठ्या भक्तिभावाने त्याचा स्वीकार करायचा! आणि केव्हातरी या फळांचा आस्वाद घेऊ म्हणून प्रधानाकडे ती फळ ठेवायचा! प्रधानाचा नौकर त्या फळांना गोठ्यात टाकून द्यायचा!असं करता करता सहा महिने गेले! साधू साधूने महाराजांना फळ देण्याचा परिपाठ चालूच राहिला! एक दिवस अचानक साधू महाराजांनी दिलेल् ते फळ महाराजांच्या हातून खाली पडल्यामुळे ते फुटलं आणि त्याच्यातून एक लखलखित असं  रत्न बाहेर पडलं!

ते पाहून राजाला आश्चर्याचा धक्काच बसला! साहजिकच सातत्याने सहामहिने दिलेल्या फळांची राजाने चौकशी केली! म्हणून ती सर्व मंडळी नोकराने  ज्या गोठ्यात गेली सहा महिने जी फळ फेकून दिली होती  त्या गोठ्याकडे गेलेत! कारण त्या फेकलेल्या फळांचं पुढे काय झालं याची सर्वांना उत्सुकता लागली होती! त्यावेळी त्यांना आणखी आश्चर्याचा सुखद धक्का बसला!

तो धक्का असा होता की- त्या सहा महिन्याच्या कालावधीत त्या फुटलेल्या प्रत्येक फळातून चमकणारे रत्न बाहेर पडलेले होते! आणि त्यामुळे संपूर्ण गोठा उजळून निघाला होता!
        मित्रांनो– राजा विक्रमादित्य त्यावेळी असा विचार करू लागला की- प्रत्येकाच्या आयुष्यातील असे  वर्तमानातील अनेक क्षणआयुष्यातील  लपंडाव सुख दुखांचा….
मित्रांनो…

मानवी जीवन कसं असतं बघा आयुष्यभर त्याच्या सुखाचा आणि वयाचा सारखाच लपंडाव चालू असतो .
         दुर्दैवाने त्याच्या सुखाचं आणि वयाच कधीच जमलं नाही  कारण तो खूप कष्ट करून मेहनत करून ज्यावेळी तो सुखाला घरी घेऊन येतो  ,त्यावेळी त्याचं वय त्याच्यावर नाराज होऊन निघून गेलेलं असतं आणि ज्यांच्या आयुष्यात या दोघांची गाठ एकत्र पडते ते खरोखरच भाग्यवंत फक्त दहा ते वीस टक्के असतात.
        
         यावर एकच उपाय आहे की आपणच आपल्याजवळ नसलेल्या गोष्टीपेक्षा असलेल्या गोष्टीतच सुख मानायचं असत कारण पूर्ण चंद्राची वाट बघता बघता  आपलं सोन्यासारखं आयुष्य आपल्या हातातून केव्हा निसटून जातं हे आपल्यालाही कळत नाही.
        
         तसं पाहिलं तर पूर्णचंद्र पेक्षा अर्धचंद्र सुद्धा अधिक सुंदर दिसू शकतो फक्त ते  आपल्या मनाने स्वीकारल पाहिजे .
           यासाठी राजा विक्रमादित्याच्या आयुष्यातील गोष्ट फारच बोलकी आहे प्रजेची मनापासून काळजी घेणाऱ्या राजा विक्रमादित्याची कीर्ती ऐकून एक साधू त्याला जंगलातील जंगली फळे रोज आणून द्यायचा राजा विक्रमादित्य मोठ्या भक्तिभावाने त्याचा स्वीकार करायचा आणि केव्हा तरी या फळांचा आस्वाद घेऊ म्हणून प्रधान कडे ती फळ ठेवायचा प्रधानाचा नौकर त्या फळांना गोठ्यात टाकून द्यायचा असं करता करता सहा महिने गेले साधू महाराजांचा विक्रमादित्य यांना फळ देण्याचा परिपाठ चालूच राहिला.
          
एक दिवस अचानक साधू महाराजांनी दिलेल् ते फळ महाराजांच्या हातून खाली पडल्यामुळे ते फुटलं आणि त्याच्यातून एक लखलखत रत्न बाहेर पडलं! ते पाहून राजाला आश्चर्याचा धक्काच बसला! सातत्याने सहा महिने त्या साधूने दिलेल्या फळांची राजाने साहजिकच चौकशी केली म्हणून ती सर्व मंडळी ,

   नोकराने फळ फेकून दिलेल्या त्या गोठ्याकडे प्रत्यक्ष काय झाले ते बघण्यासाठी गेलीत! त्यावेळी त्यांना आणखी आश्चर्याचा सुखद असा दुसरा धक्का बसला! कारण त्या सहा महिन्याच्या कालावधीत त्या फुटलेल्या प्रत्येक फळातून चमकणारे रत्न बाहेर पडलेले होते! त्यामुळे संपूर्ण गोठा उजळून निघाला होता!
  
        मित्रांनो- राजा विक्रमादित्य त्यावेळी असा विचार करू लागला की–प्रत्येकाच्या आयुष्यातील असे  वर्तमानातील अनेक रत्नासारखे क्षण असतात पण–  दुर्दैवाने ते आपण उद्याच्या सुखासाठी गमावून बसतो! म्हणूनच मित्रांनो- आज आपल्या हाती आलेला प्रत्येक क्षण हा सोन्यासारखा असतो! कारण हे आयुष्य आपल्याला कधीच परत मिळत नाही!
       
म्हणूनच  आपल्या आयुष्यातील प्रत्येक सोनेरी क्षणांच सुखात रूपांतर करणं हे सर्वस्वी केवळ आपल्याच हाती आहे आणि ते प्रत्येकाने करावं हाच संदेश या घटनेतून आपल्याला प्राप्त होतो!

       मला वाटतं आजचां विषय आपल्या पर्यंत पोहोचलेला आहे! म्हणून मी इथेच थांबतो!
       (शब्दांकन-ला. डॉ. शाळिग्राम भंडारी,तळेगाव दाभाडे)

error: Content is protected !!