वडगाव मावळ:
आधारकार्ड अपडेट करण्यासाठी मावळ तालुक्यात आधारकार्ड मशिनची कमतरता आहे,ही कमतरता दुर करून अत्यावश्यक आधारकार्ड मशीन उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी तळेगाव दाभाडे शहर भाजपाच्या वतीने करण्यात आली.
मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली. तसेच आधार अद्यायावतीकरण शिबिर आयोजित करावीत अशीही मागणी भारतीय जनता पार्टी च्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी शहराध्यक्ष रविंद्र बाळासाहेब माने,नगरसेविका सौ.शोभाताई भेगडे,सरचिटणीस श्रीमती रजनीताई ठाकूर,सौ.शोभाताई परदेशी,ओबीसी मोर्चा अध्यक्ष श्री.नितीन पोटे,कार्याध्यक्ष श्री.सचिन जाधव,सोशल मीडिया अध्यक्ष श्री.उपेंद्र खोल्लम,कामगार आघाडी अध्यक्ष श्री.अशोक दाभाडे, कार्याध्यक्ष श्री.स्वप्निल भेगडे,ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडी अध्यक्ष श्री.अनिल वेदपाठक,सचिव श्री.वालावलकर काका,व्यापारी आघाडी कार्याध्यक्ष श्री.सागरशेठ शर्मा,अनुसुचित जाती मोर्चा अध्यक्ष श्री.सुनिल कांबळे,पदवीधर आघाडी कार्याध्यक्ष श्री.संतोष भोसले,ओबीसी मोर्चा प्रसिद्धी प्रमुख श्री.अमित भागीवंत,का.आ.उपाध्यक्ष श्री.अनिल शेलार,शहर सचिव श्री.महावीर कनमुसे उपस्थित होते.
- शिवराज पॅलेस ‘ बँक्वेट हाॅलचे सीता खंडू वायकर व खंडू आबाजी वायकर यांच्या हस्ते उद्घाटन
- महागाव येथे कालाष्टमी व श्री. काळभैरवनाथ जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
- इंदोरीत शनिवार दि.२३ नोव्हेंबरला समाजप्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख यांचे किर्तन
- रविवार, २४ नोव्हेंबर रोजी गझलपुष्पचा वर्धापनदिन सोहळा : रविंद्र भेगडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
- संपतराव पांडुरंग गराडे यांचे निधन