दिव्यांग बांधवांना पूर्ववत तीन हजार रुपये मासिक अनुदान मिळणार: किशोर आवारे
तळेगाव दाभाडे:
तळेगाव शहरातील दिव्यांग बांधवांना पूर्ववत तीन हजार रुपये मासिक अनुदान मिळणार असल्याचे किशोर आवारे यांनी जाहीर केले.
तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयात आज सर्व दिव्यांग बांधव मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या दालनामध्ये मासिक अनुदानाबाबत जनसेवा विकास समितीच्या कार्यकर्त्यांच्या बरोबर चर्चेसाठी दाखल झाले होते. जनसेवा विकास समितीच्या वतीने प्रवक्ते मिलिंद अच्युत कार्याध्यक्ष कल्पेश भगत नगरसेवक सुनील कारंडे ,रोहित लांघे, निलेश पारगे, अनिल भांगरे आदी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून दिव्यांग बांधवांच्या वतीने मुख्याधिकारी सरनाईक यांच्याशी चर्चा केली.
मुख्याधिकारी सरनाईक यांनी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्याशी फोन द्वारे चर्चा करून तीन हजार रुपये मासिक अनुदान देण्यास तत्वतः मान्यता दिली, तसेच एकूण बजेट मधील वाढीव तरतुदी करिता योग्य ती पावले उचलून दिव्यांग बांधवांच्या मासिक अनुदानाचा प्रश्न तडकाफडकी सोडवण्यात आला. तळेगाव शहरातील सुमारे दोनशे दिव्यांग बांधव नगरपरिषदेच्या प्रांगणामध्ये उपस्थित होते.
त्यामध्ये प्रामुख्याने दिव्यांग संस्थेचे किशोर कुलकर्णी, राजेंद्र थोरात, मनोज हब्बू, निखिल बोत्रे रंजना गोडसे, विठ्ठल हिंनकुले, स्वप्निल पाटील, किशोर दिघे तसेच बहुसंख्य महिला व बाल दिव्यांग देखील उपस्थित होते. जनसेवा विकास समितीच्या वतीने मुख्याधिकारी सरनाईक यांना लेखी पत्र देऊन मासिक अनुदान तीन हजार रुपये करण्याबाबत विनंती केली होती त्या विनंतीला सकारात्मक साथ देत मुख्याधिकारी सरनाईक यांनी जनसेवा विकास समितीला लेखी पत्र देऊन तीन हजार रुपये मासिक अनुदान देणार असल्याचे जाहीर केल्यामुळे दिव्यांग बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तळेगाव शहरांमध्ये किशोर आवारे नेहमीच दिव्यांग बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात, दिव्यांग बांधवांचे अनेक प्रश्न किशोर आवारे यांनी यापूर्वी सोडवलेले आहेत, किशोर आवारे नेहमीच दिव्यांग बांधवांच्या मागे देवासारखे उभे राहतात, मासिक वेतनाबाबत किशोर आवारे यांनी मध्यस्थी केल्यामुळेच सदर प्रश्न सुटल्याचे दिव्यांग संस्थेचे किशोर कुलकर्णी यांनी यावेळी नमूद केले.
- शिवराज पॅलेस ‘ बँक्वेट हाॅलचे सीता खंडू वायकर व खंडू आबाजी वायकर यांच्या हस्ते उद्घाटन
- महागाव येथे कालाष्टमी व श्री. काळभैरवनाथ जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
- इंदोरीत शनिवार दि.२३ नोव्हेंबरला समाजप्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख यांचे किर्तन
- रविवार, २४ नोव्हेंबर रोजी गझलपुष्पचा वर्धापनदिन सोहळा : रविंद्र भेगडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
- संपतराव पांडुरंग गराडे यांचे निधन