दिव्यांग बांधवांचे अनुदान कमी करू नये, अन्यथा तीव्र आंदोलन करणार : किशोर आवारे
तळेगाव स्टेशन:
तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या वतीने शहरातील सुमारे ३९० दिव्यांग बांधवांना मानधन देण्यात येत आहे. सदरचे मानधन गेली दोन वर्ष तीन हजार रुपये महिना याप्रमाणे देण्यात येत होते ,परंतु तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व प्रशासक विजयकुमार सरनाईक यांनी दिव्यांग बांधवांना मिळणाऱ्या अनुदानात कपात होणार असल्याचे सूचित केल्याने दिव्यांग बांधवांच्यावर संकट कोसळल्यासारखे झाले होते .
अनेक वेळा नगरपरिषदेत जाऊन सुद्धा दिव्यांग बांधवांना न्याय मिळत नव्हता . त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून तळेगाव शहरातील सर्व दिव्यांग बांधवांनी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्याशी संपर्क साधून अन्यायकारक अनुदान कपात थांबवण्यासाठी साकडे घातले होते.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त तळेगाव स्टेशन येथे किशोर आवारे यांना दिव्यांग बांधवांच्या साम्राज्य दिव्यांग गट यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
दिव्यांग बांधव समाजातील महत्त्वाचा घटक आहे. दिव्यांग बांधवांवर नेहमीच कळतनकळत पणे अन्याय होत असतो. तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या वतीने करण्यात येणारी अनुदान कपात होऊ देणार नाही, तसेच जर अशी कुठल्याही प्रकारची कपात केली तर दिव्यांग बांधवांच्या न्याय हक्कासाठी आक्रमक आंदोलन करणार असल्याचे किशोर आवारे यांनी नमूद केले आहे.
यावेळी जनसेवा विकास समितीचे किशोर आवारे,
नगरसेवक समीर खांडगे, सुनील कारंडे, प्रवक्ते मिलिंद अच्युत, दीपक कारके,अनिल भांगरे ,अनिल ठाकूर,निलेश पारगे
दिव्यांग संस्थेचे किशोर कुलकर्णी राजेंद्र थोरात ,मनोज हब्बु, निखिल बोत्रे, रंजना गोडसे, विठ्ठल हिनकुले, स्वप्नील पाटील तसेच मोठ्या प्रमाणात दिव्यांग बांधव उपस्थित होते.
- शिवराज पॅलेस ‘ बँक्वेट हाॅलचे सीता खंडू वायकर व खंडू आबाजी वायकर यांच्या हस्ते उद्घाटन
- महागाव येथे कालाष्टमी व श्री. काळभैरवनाथ जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
- इंदोरीत शनिवार दि.२३ नोव्हेंबरला समाजप्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख यांचे किर्तन
- रविवार, २४ नोव्हेंबर रोजी गझलपुष्पचा वर्धापनदिन सोहळा : रविंद्र भेगडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
- संपतराव पांडुरंग गराडे यांचे निधन