टाकवे बुद्रुक:
रोहिदास नाना असवले स्पोर्टस फाऊंडेशन व कळकराई स्पोर्टस फाऊंडेशन आयोजित कळकराई येथे क्रिकेट स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते.
क्रिकेट स्पर्धेत मध्ये सहभागी झालेल्या सर्व संघांना रोहिदास असवले यांच्या वतीने टी-शर्ट वाटप करण्यात आले. टाकवे नाणे जिल्हा परिषद गट भाजपा अध्यक्ष रोहिदास असवले यांच्या हस्ते फूल पिच क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
आंदर मावळचे शेवटचे टोकदार असलेल्या कळकराई येथील युवकांच्या माध्यमातून क्रिकेटमध्ये सहभागी झालेल्या सर्व क्रिकेट संघाकडून रोहिदास असवले व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी सरपंच नामदेव गोणटे ,शोभिनाथ भोईर,बाळासाहेब शिंदे बाळासाहेब करवंदे, सुरेश आलम, चिकू वायकर,भाजपा ज्येष्ठ नेते तुकाराम कोद्रे,माजी ग्रामपंचायत सदस्य रोहिदास जांभुळकर, काशिनाथ जांभुळकर, मुन्नावर आत्तार, समीर असवले, किरण साबळे माजी चेअरमन विकास असवले,माजी ग्रामपंचायत सदस्य उमाकांत मदगे, सोमनाथ असवले, संतोष कोंडे, माजी ग्रामपंचायत सदस्य आतिश मोरे, संजू जगताप, गुणवंत कामगार शंकर असवले,पराग सावंत उपस्थित होते.
- भाजपा मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांचे शक्तिप्रदर्शन : लोणावळ्यामधील गणेशोत्सव दर्शनपर भेटींना कार्यकर्त्यांचा उस्फुर्त प्रतिसाद
- गणपती दान आणि निर्माल्य दान उपक्रम
- अध्यात्म देशविघातक शक्तींना प्रतिबंध करू शकते!” – ॲड. सतिश गोरडे
- लोणावळ्यातील दाऊदी बोहरा समाजाने सर्व केला मिलाद-उन-नबी (SA) साजरा
- वातावरणातील बदलानुसार भात पिकावरील कीड रोग व्यवस्थापन करा