देहू:
जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या जीवनकार्यातील प्रसंगचित्रण यावरील दिनदर्शिका अनावरण पद्मविभूषण  शरद पवार  यांच्या शुभहस्ते करण्यात आले. छत्रपती शिवाजीमहाराज व जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या प्रतिमचे पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

तत्पूर्वी पवार यांनी विठ्ठल मंदिरात स्वयंभू विठ्ठल आणि संत तुकाराम महाराज यांचे दर्शन घेतले. जगद्गुरू श्री.संत तुकाराम महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना पवार यांनी संत तुकाराम महाराज यांच्या अंभगाचे दाखले दिले. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा विचार चारशेहून अधिक काळ आपणाला दिशा दर्शक ठरतोय असे ही पवार म्हणाले.

यावेळी सौ.प्रतिभा काकी शरद पवार, एम.ई.पी. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेडचे सर्वेसर्वा जयंत म्हैसकर,आमदार  सुनिल शेळके, आमदार दिलीप मोहिते ,माजी आमदार उल्हास पवार, देहू  संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे इनामदार,ज्येष्ठ नेते प्रकाश म्हस्के,अंकुश  काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश  खांडगे, नगराध्यक्ष  स्मिता चव्हाण , संदीप आंद्रे उपस्थित होते.

उल्हास पवार म्हणाले,” तीर्थक्षेत्र  विकासाची मुहूर्तमेढ  पवारांनी रोवली, त्यामुळे आज देहू,आळंदी सह पंढरपुरच्या पालखी मार्ग सुसज्ज स्थिती दिसत आहे. पालखी मार्गावरील वृक्षारोपण,आरोग्य सुविधा,पिण्याच्या पाण्याच्या सुविधा देण्यास पवार कायमच तत्पर असायचे. त्यांच्या दूरदृष्टीतून तीर्थस्थळ परिसर विकसित झाल्याची पहायला मिळतात. 

संत तुकोबारायांच्या जीवनावर चित्रफीत निर्माण करावी अशी मागणी देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी प्रास्ताविकात केली. मोरे यांनी केलेल्या या मागणीचा धागा धरीत,पवार यांनी या क्षेत्रातील दिग्गजांना सोबत घेऊन लवकरच चित्रफीत काढण्यात येईल असे आश्वासन दिले.
विकास कंद यांनी सुत्रसंचालन केले.

error: Content is protected !!