वडगाव मावळ :
वडगाव नगरपंचायतच्या उपनगराध्यक्ष पदासाठी आज झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सायली रुपेश म्हाळसकर यांची आज बिनविरोध निवड झाली.

नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली  मुख्याधिकारी प्रवीण निकम, मावळते उपनगराध्यक्ष राजेंद्र कुडे, गटनेते प्रमिला बाफना, दिनेश ढोरे यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष सभेत निवडणूक प्रक्रिया पार पडली.

यावेळी नगरसेवक राहुल ढोरे, चंद्रजीत वाघमारे, मंगेश खैरे, शारदा ढोरे, पूजा वहिले, माया चव्हाण, पुनम जाधव, भाजपचे नगरसेवक किरण म्हाळसकर, प्रवीण चव्हाण, दिलीप म्हाळसकर, रवींद्र म्हाळसकर, अर्चना म्हाळसकर, सुनीता भिलारे, दीपाली मोरे उपस्थित होते.

निवडीनंतर माजी उपसभापती गणेश अप्पा ढोरे, भाजपचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर, गुलाबराव म्हाळसकर, सुभाषराव जाधव, तुकाराम ढोरे, सुनील ढोरे, पंढरीनाथ ढोरे, राजेश बाफना, शहराध्यक्ष प्रवीण ढोरे, विशाल वहिले, अनंता कुडे आदींनी म्हाळसकर यांचा सत्कार केला.

error: Content is protected !!