वडगाव मावळ:
मोरया महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून वडगाव शहरातील महिलांसाठी एक वर्षाकरिता कायमस्वरूपी घरगुती स्वयंरोजगार योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे यांच्या संकल्पनेतून मोरया महिला प्रतिष्ठान च्या माध्यमातून आणि नगरसेविका पूनम खंडेराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थित या स्वयंरोजगाराचा करण्यात आला.
यावेळी पंचमुखी मारुती मंदीर प्रांगणात महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी प्रशिक्षक नजीर शेख यांनी महिला भगिणींना अतिशय सोप्या पद्धतीने प्रशिक्षणाचे मार्गदर्शन केले.
आजच्या युगात महिलांनी स्वावलंबी व्हावे यासाठी हे एकदिवसीय प्रशिक्षण महिलांसाठी मोफत ठेऊन महिलांना आत्मनिर्भर होण्याआठी अतिशय मोलाचे व उपयुक्त ठरणार आहे.
वडगाव शहरातील महिला भगिनींना घरातील दिवसभराचे सर्व काम उरकून निवांत असलेल्या वेळेत छोटे छोटे आकाश कंदील बनवणे हा घरगुती पद्धतीचा स्वयंरोजगार येत्या पाच मार्चपासून सुरू करण्यात येणार असून यातून महिला भगिणींना नक्कीच समाधानकारक असे मानधन मिळेल असा विश्वास नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या वतीने नगरसेविका पूनम जाधव यांनी व्यक्त केला.
आजच्या प्रशिक्षणात महिलांनी छोटे आकाश कंदील बनवणे ही एक वर्षभरासाठी कायमस्वरूपी संकल्पना आहे. यात महिला भगिनी स्वतः घरगुती स्वयंरोजगारातून आर्थिक उत्पन्नाचे स्तोत्र निर्माण करू शकतात.
यावेळी सुमारे साडेतीनशे ते चारशे महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. स्वयंरोजगार प्रशिक्षण शुभारंभ प्रसंगी नगरसेविका पूनम जाधव, मोरया महिला प्रतिष्ठानचे सल्लागार यशवंत शिंदे, तसेच प्रतिष्ठानच्या जयश्री जेराटागी, सुषमा जाजू, विजया माळी आणि संचालिका, सदस्या तसेच वडगाव शहरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
- विकासकामे केली म्हणता, मग पैसे, साड्या का वाटता?
- देहूगावात विकासाच्या जोरावर सुनील शेळके यांच्या प्रचारासाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी
- आमदार सुनील शेळके यांना मोदींचा आशीर्वाद ‘विजयी भव’!
- समर्थ विद्यालयात तब्बल ४२ वर्षांनी भरला इ.१०वीचा वर्ग देश विदेशातून विद्यार्थ्यांची हजेरी
- औद्योगिक नगरीत मतदार जनजागृती अभियान