सकारात्मक विचारांचा माणूस– त्याला फेकून मारलेल्या दगडाचं रूपांतर विटेत करतो .आणि त्याच विटेचं घर बांधून आपला आनंद साजरा करतो. चला तर मग त्या संदर्भात संवाद साधूया—मित्रांनो, माणसं नेहमी जशास तसं या न्यायाने वागलं पाहिजेत किंवा ईट का जवाब पत्थर से असं शिकवणारे तर बरेच जण असतात.
पण आपल्या अंगावर फेकल्या जाणाऱ्या दगड विटांच करायचं काय या प्रश्नावर एखादा माणूस सकारात्मक सुंदर चांगला मार्ग काढू शकतो. तो माणूस सकारात्मक असल्यामुळे कदाचित त्याच्याकडे फेकलेल्या दगड विटांपासून स्वतःसाठी सुंदरसं घर प्रामाणिकपणे तयार करू शकतो त्याला पण खरा समजूतदार व्यक्ती म्हणू शकतो.
त्यामुळे आपणही असंच वागायला हवं व अशा लोकांच्या संगतीत राहायला हवं कारण त्यामधूनच एक वेगळा आनंद आपल्याला मिळू शकतो आणि तेच समजूतदार माणसाच लक्षण आणि वैशिष्ट्य आहे. असं समजायला काहीच हरकत नाही. सकारात्मक विचार करणारा माणूस प्रतिक्रिया ऐवजी प्रतिसाद देईल एवढेच.
नव्हे तर तो माणूस बदला घेण्या ऐवजी त्याच्यात तो बदल घडवण्याचा प्रयत्न करेल आणि म्हणूनच मित्रांनो जो माणूस प्रत्येक अपयशातून नवीन असं काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतो आणि शेवटी तो त्यात यशस्वी होतोच. त्यामुळेच तो आपलं आनंदी राहण्याच ध्येय सहज गाठतो . समजदार माणसाची हीच लक्षण आहेत .
आणि ती प्रत्यक्ष आपल्या कृतीत जी माणसं आणतील तीच माणसं अर्थपूर्ण जीवन जगतील मित्रांनो मला वाटतं आजच्या चिंतनाचा अर्थ आपल्याला कळलेला आहे म्हणून मी इथेच थांबतो.
( शब्दांकन- लायन डॉक्टर शाळीग्राम भंडारी तळेगाव दाभाडे)