तळेगाव दाभाडे:  आयडेंटिटीशिल्ड समिट २०२५” प्रकल्प स्पर्धेत नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीना ५ लाखाचे बक्षीस मिळाले. मिनीऑरेंज अस्थापना पुणे, यांच्या मार्फत ” आयडेंटिटीशिल्ड समिट २०२५” ही प्रकल्पस्पर्धा ध्रुव ग्लोबल स्कुल पुणे येथे नुकतेच घेण्यात आली.
या स्पर्धेमध्ये नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयातील संघ सहभागी झाला होता. इनोव्हेशन सॅन्डबॉक्समध्ये विद्यार्थी, तरुण उद्योजक आणि सुरक्षा आणि तंत्रज्ञानामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी वेगवेगळ्या संघाकडून प्रतिभा आणि कल्पकतेचे अविश्वसनीय प्रदर्शनाचे सादरीकरण करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये विविध क्षेत्रातील तज्ञांनी परीक्षण केले. नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीच्या लतिका मनोज रे, गौरी राजेश डेरे, भाग्यश्री किसान सुरवसे, सानिया जलील शेख या द्वितीय वर्ष संगणक विभागातील विद्यार्थ्यांनी ” ईक्यू प्ले” हा प्रकल्प सादर केला होता. हा प्रकल्प सादर करताना, भावनिक बुद्धिमत्ता,  सूसंस्कार आणि सामाजिक बदल या बाबींचा समावेश केला. प्रकल्प सादरीकरणाने मिनीऑरेंज अस्थापना पुणेचे सीईओ अनिबर्न मुखर्जी यांनी प्रकल्पाची सामाजिक परिणामकरिता लक्षात घेऊन पाच लाखाचे विशेष बक्षीस विद्यार्थिनींना प्रदान केले.
‘नवीन कल्पनांना वाव देण्यासाठी आणि डिजिटल इनोव्हेशनला प्रोत्साहन देण्यासाठीही स्पर्धा आयोजित करण्यात आली. ईक्यू प्ले या प्रकल्पास मिळालेला हा गौरव भविष्यातील सकारात्मक सामाजिक बदलाच्या दिशेने एक पाऊल असल्याचे,’ सीईओ मुखर्जी यांनी सांगितल.
संस्थेचे अध्यक्ष संजय (बाळा ) भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार तसेच अभियांत्रिकीचे कार्यकारी समितीचे चेअरमन राजेश म्हस्के, नूतन अभियांत्रिकीचे सीईओ डॉ. रामचंद्र जहागीरदार, प्राचार्य डॉ. एस.एन. सपली, संगणक विभागाचे विभागप्रमुख डॉ. प्रसाद ढोरे, डॉ. विलास देवतारे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

error: Content is protected !!