निगडी,- येथील डॉ.अरविंद ब. तेलंग वरिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय युवा दिनानिमित्त स्वामी विवेकानंद जयंती वाणिज्य विभागाच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाप्रसंगी युवकांचे प्रेरणास्थान डॉ.दत्तात्रय खुणे सर स्वामी विवेकानंदांच्या भूमिकेमध्ये आल्यावर सभागृहामध्ये टाळ्यांच्या कडकडात झाला. जसे की स्वामी विवेकानंदांचे निगडी प्राधिकरण येथे अवतरण झाल्याचे भासू लागले. स्वामी विवकानंदांकच्या भूमिकेमध्ये डोक्याला भगवा फेटा, अंगावर लांबसडक असे भगवे वस्त्र परिधान करून अगदी हुबेहूब पोशाखात अवतरले.
महाविद्यालयातील वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.डॉ. दत्तात्रय खुणे यांनी स्वामी विवेकानंदाच्या पेहरावात आले आणि आपले विचार मांडले. अगदी स्वामीसारखी सारखीच देहबोली, स्वामी विवेकानंदाचे बालपण, बालपणातील त्यांच्या आठवणी ,गुरू रामकृष्ण परमहंस यांच्यातील गुरु शिष्याचे दृढ नाते यांच्यातील स्नेहसंबंध, संवाद, आणि शिकवण हे विचार मांडताना प्रसंग हुबेहूब उभे केले.
मानवी जीवनात ध्यानाचे आणि एकाग्रतेचे अमूल्य महत्त्व असल्याचे सांगितले. बालविवाह आणि स्त्री मुक्ती , गोरगरीब दलितांसाठी असणारे आरक्षण यांचे समर्थन, आणि हिंदू-मुस्लिम समन्वय हवा याविषयी त्यांचे विचार मांडले.
अमेरिकेतून भारतात आल्यानंतर भारतीय युवकांना चला उठा , जागे व्हा आणि ध्येय प्राप्त झाल्याशिवाय थांबू नका अशी हाक दिली. त्या प्रसंगाची आठवण करून दिली.कार्यक्रम संपल्यावर विद्यार्थ्यांनी सेल्फी घेण्यासाठी गर्दी केली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश पाटीलसर यांचे सहकार्य लाभले .कार्यक्रमाप्रसंगी डॉ.बाळासाहेब सोनवणे , डॉ.विकास शेवाळे, डॉ.गणेश भामे, प्रा.तुषार भोसले,प्रा.सुरेंद्र गायकवाड, डॉ.शशिकांत मेमाणे, डॉ.अनिल नागणे, डॉ.संगीता साळवे, डॉ.एलिझाबेथ कोशी,प्रा. निक्सन थॉमस, डॉ.वैभव काळे, डॉ.स्वाती गवई,प्रा.विनायक मिडगुडे,प्रा.दिलीपकुमार जाल्लुपल्ली, प्रा.दुर्गा भिसे,प्रा.पल्हवी सपाटे, प्रा.अनघा डंके, डॉ.संगीता रॉय, प्रा.सोनाली सोनवणे प्रा. प्रतिभा पवार,प्रा. विशाल वानखेडे,प्रा.चेतन कुऱ्हाडे,प्रा.सुखदेव जाधव आदी प्राध्यापक-प्राध्यापिका व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
कार्यक्रमाचे आयोजन डॉ.ज्योती वाणी यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा.आरती शेगोकार यांनी तर आभार प्रा.शुभांगी गायकवाड यांनी मानले.
- चिखलीत राज्यस्तरीय गदिमा कविता महोत्सव
- चांदखेडला ‘बाप समजून घेताना’ व्याख्यान
- आयडेंटिटीशिल्ड समिट २०२५” प्रकल्प स्पर्धेत नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीना ५ लाखाचे बक्षीस
- डॉ.अरविंद ब.तेलंग वरिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय युवा दिन स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी
- सर्वांचे प्रेम हेच जीवनाचे संचित : डॉ. श्रीपाल सबनीस