खांडी : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने पुणे जिल्हा परिषदेच्या विविध स्तरावर यशवंतराव चव्हाण कला-क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या यामध्ये खडकाळा- ब या बीटातील खांडी केंद्रातील अति दुर्गम खांडी शाळेने मोठ्या गटाचे लोक नृत्य, भजन, कविता गायन बुद्धिबळ, मुलींची लंगडी, मुलांचा आट्यापाट्या खेळ, मुलांची कबड्डी, लहान गटात लिंबू चमचा, बेडूक उड्या या सर्व कला क्रीडांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
दोन दिवसीय स्पर्धेमध्ये खांडी शाळेचा इयत्ता ५वी चा विद्यार्थी नक्ष तुकाराम भोकटे या विद्यार्थ्याने मावळ तालुकापातळीवर बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविला . व तसेच मुलांच्या कबड्डी संघाने द्वितीय क्रमांक पटकावून खांडी शाळेचे नाव मावळ तालुक्यात झळकवले. यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षकांचे मनापासून अभिनंदन होत आहे.
खांडी केंद्राचे केंद्रप्रमुख केदार तसेच वडेश्वर केंद्राचे केंद्रप्रमुख मोरमारे शालेय व्यवस्थापन अध्यक्षा सावित्रीताई शिवराम नगरकर खांडी गावचे सरपंच कुंडलिक निसाळ, खांडी गावचे माजी सरपंच अनंता पावशे, खांडी शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा बारवकर , मार्गदर्शक शिक्षक ठाकरे , सुषमा खरात ,शेख सर, समस्त पालक वर्गानी आनंद आणि समाधन व्यक्त केले.
- दादाभाऊ गणपत गायकवाड यांचे निधन
- पंचाहत्तरीनिमित्त निवेदक सुधीर गाडगीळ यांचा विशेष सत्कार व सांस्कृतिक संचित कार्यक्रम
- असवले इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये बालजत्रेची धूम
- कला-क्रीडा महोत्सवात अति दुर्गम भागातील खांडी शाळेने पटकविला मानाचा तुरा : पाचवी इयत्तेचा नक्ष भोकटे ठरला मावळ तालुकापातळीवरील बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता
- सांगिसे विद्यालयात सॅनिटरी डिस्पेन्सर व डिस्पोजल मशीनचे उदघाटन