कामशेत: सांगिसे ता. मावळ येथील बोधिसत्व प्रतिष्ठान संचलित माध्यमिक विद्यालय सांगिसे या विद्यालयात लायन्स क्लब ऑफ भोसरी यांच्या सोजन्याने ग्रामीण भागातील मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन डिस्पेंसरी व डिस्पोजल यंत्रणेची अत्याधुनिक मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहे .या दोन्ही मशीनचे उद्घाघाटन प्रमुख पाहुणे क्लबचे माजी प्रांतपाल बाळकृष्ण जोशी व अध्यक्षा मनिषा माने यांच्या शुभहस्ते करण्यात आले.तसेच यावेळी सुस्थितीतील एक लॅपटॉपही शाळेस उपलब्ध करून देण्यात आला आहे.
या विद्यालयातील मुलींसाठी ही अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली असून याचा विनियोग विद्यार्थीनींनी करावा असे आवाहन यावेळी प्रमुख पाहुण्यांनी केले. या वेळी कार्यक्रमास क्लबच्या रिजन चेअरपर्सन माजी प्राचार्य शैलजाताई सांगळे ,सचिव रूपालीताई,बिराजदार, श्यामकुमार माने, बीनाताई जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. पाहुण्यांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता वंजारी व शिक्षक -पालक संघाच्या उपाध्यक्षा जयश्री गरुड यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून मार्गदर्शनही केले.
कार्यक्रमाचे संयोजन संस्थेचे अध्यक्ष गोकुळ गायकवाड व सचिव लहू कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.सुत्रसंचलन अंबादास गर्जे यांनी केले तर आभार अनिल शिंदे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर अरनाळे,सविता शिंदे, दशरथ ढोरे यांनी परिश्रम घेतले.
- दादाभाऊ गणपत गायकवाड यांचे निधन
- पंचाहत्तरीनिमित्त निवेदक सुधीर गाडगीळ यांचा विशेष सत्कार व सांस्कृतिक संचित कार्यक्रम
- असवले इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये बालजत्रेची धूम
- कला-क्रीडा महोत्सवात अति दुर्गम भागातील खांडी शाळेने पटकविला मानाचा तुरा : पाचवी इयत्तेचा नक्ष भोकटे ठरला मावळ तालुकापातळीवरील बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता
- सांगिसे विद्यालयात सॅनिटरी डिस्पेन्सर व डिस्पोजल मशीनचे उदघाटन