वडगाव मावळ: मावळचे आमदार सुनिल शेळके यांना मंत्रिपद मिळण्यासाठी नाणोली गावातील श्री फिरंगाई मातेला महाअभिषेक करून साकडे घालण्यात आले.आमदार सुनिल शेळके यांची पुन्हा एकदा मावळच्या आमदार पदी विक्रमी मतांनी निवड झाल्यानंतर त्यांना मंत्रिपद मिळावे यासाठी नाणोली गावातील आमदार सुनिल शेळके युवा मंचच्या वतीने ग्रामदैवत श्री फिरंगाई देवीला माता – भगिनींच्या शुभहस्ते महाअभिषेक घालून महापुजा करण्यात आली.
उंच कड्यावरील कातळ शिल्पात कोरलेल्या मंदिरात ग्रामदैवत श्री फिरंगाई मातेचे देवस्थान असून पंचक्रोशीतील भाविकांचे मुख्य श्रध्दास्थान आहे. ३ किमी. चा डोंगर चढून देवीला साकडं घालण्यासाठी बहुसंख्येने माता – भगिनी व कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार सुनिलआण्णा शेळके युवा मंच च्या वतीने भाविकांसाठी फराळाचे आयोजन करण्यात आले होते.
      यावेळी मावळ ता.ख.वि.संघाचे संचालक माजी सरपंच निलेश संभाजी मराठे, माजी उपसरपंच काळुराम मराठे, ग्रा.प.सदस्य विवेक शिंदे, ग्रा.प.सदस्य निलेश दत्तू मराठे, युवा नेते अंकुश शिंदे, संकेत जगताप, शंकर कोंडे, अनिकेत जगताप, प्रितेश आल्हाट, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष नाथा लोंढे, मोहन मराठे, दत्ता मांजरे, आकाश महाराज लोंढे, गणेश आल्हाट, प्रतिक जगताप, अक्षय लोंढे, अमोल दरवडे, सोमनाथ मराठे, प्रणय आल्हाट, सार्थक मराठे, अभि शिंदे, ओंकार भोसले, ऋतिक जगताप, श्रेयस आल्हाट आदि कार्यकर्ते व मोठ्या संख्येने माता-भगिनी उपस्थित होत्या.

error: Content is protected !!