तळेगाव दाभाडे:  मावळ तालुक्यातील माध्यमिक शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान, (२०२४-२०२५) राबविण्यात येत असून या अभियानामध्ये तालुक्यातील सर्व शाळांनी सहभागी व्हावे असे आवाहन पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष राजेश गायकवाड यांनी केली आहे
  पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ व पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्ह्यात शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान शिक्षणाधिकारी डॉक्टर भाऊसाहेब कारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे या अभियानात मावळ तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळांनी सहभागी व्हावं असे आवाहन उपाध्यक्ष गायकवाड यांनी केले आहे.   
हे अभियान यशस्वीपणे राबवण्यासाठी या अभियाना च्या तपासणी अहवालामध्ये असणारे सर्व विस्ताराधिकारी केंद्रप्रमुख मुख्याध्यापक व लिपिक यांची सहविचार सभा नुकतीच तळेगाव दाभाडे येथील अ्ड पु. वा. परांजपे विद्यामंदिर येथे संपन्न झाली
  तळेगाव येथील सहविचार सभेस मावळ तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज,मावळ तालुका मुख्याध्यापक संघ अध्यक्ष विठ्ठल माळशिकारे ,कार्याध्यक्ष रमेश आरगडे,सचिव विकास तारे,मुख्याध्यापक पांडुरंग पोटे मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका संघाचे अध्यक्ष विठ्ठल माळशिकारे यांनी केले तर सूत्रसंचालन विकास तारे आणि आभार पांडुरंग पोटे यांनी मांडले.हे डिसेंबर महिन्यामध्ये राबवण्यात येणार आहे . तालुका जिल्हास्तरीय असे हे अभियान आहे.ग्रामीण आणि शहरी माध्यमिक शाळा असे दोन महत्त्वाचे गट असून प्रत्येक गटात १.500 पर्यंत विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा २.५०० ते १००० विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा ३.१००० चे वर विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा असे गट राहणार आहेत शहरी विभागात आणि ग्रामीण विभागात वरील प्रमाणे गट निश्चित करण्यात आलेले आहेत
     मावळ तालुक्यात माध्यमिक स्तरावर एकूण ८३ शाळा असून त्यातील सर्व शाळांनी या अभियानात सहभागी व्हावं असे आवाहन तालुका गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज तालुका मुख्याध्यापक संघ अध्यक्ष विठ्ठल माळशिकरे तसेच पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ उपाध्यक्ष राजेश गायकवाड यांनी केली आहे.

error: Content is protected !!