वडगाव मावळ: मावळ तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक अतुल वायकर यांच्या ब्राम्हणवाडी जांभूळफाटा येथील ‘ शिवराज पॅलेस’ या बँक्वेट हाॅलचे उद्घाटन सीता खंडू वायकर व खंडू आबाजी वायकर यांच्या हस्ते करण्यात आले.ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे यांनी शुभेच्छा दिल्या.
पुणे जिल्ह्यातील हॉटेल व्यवसायात नावाजलेल्या हॉटेल शिवराजच्या अतुल वायकर यांनी मावळ तालुक्यात नव्याने सुरू केलेले दालन सर्व सुविधा असे दालन आहे. कुंकुमतिलक, साखरपुडा, विवाह सोहळा, डोहळेजेवण, वाढदिवस, सत्कार समारंभ, कॉन्फरन्स बैठका आदि कार्यक्रमांसाठी शिवराज पॅलेस सोयीचा ठरणार आहे.
पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर हे दालन आहे. प्रशस्त पार्किंग व्यवस्था आहे. प्युअर व्हेज भोजनाची सोय असणार आहे. उद्घाटनप्रसंगी उद्योजक विलास शेठ काळोखे, माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे, माजी सभापती गुलाबराव म्हाळस्कर, ज्येष्ठ नेते अविनाश बवरे, माजी उपसभापती प्रविण चव्हाण, माजी उपसरपंच पंढरीनाथ ढोरे, उद्योजक सुधाकर शेळके, माजी सरपंच बाळासाहेब ढोरे, पै. संभाजी राक्षे, वि. म. शिंदे गुरूजी, पोलीस निरीक्षक कुमार कदम, नंदकुमार शेलार, यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
स्वागत अरूण वाघमारे यांनी केले. प्रास्ताविक नवनाथ शेळके यांनी केले. सुत्रसंचालन महादेव वाघमारे यांनी केले. आभार अतुल वायकर यांनी मानले.

error: Content is protected !!