पिंपरी: “भारतीय संविधान टिकवणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे!” असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विलास थोरात यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह, राजीव गांधीनगर, नवी सांगवी येथे व्यक्त केले.
संविधान सन्मान उपक्रमांतर्गत संविधान उद्देशिका वाचन आणि वाटप कार्यक्रमात विलास थोरात बोलत होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीसह स्थानिक ग्रामस्थांनी याप्रसंगी मोठ्या प्रमाणावर उपक्रमात सहभाग घेतला होता. यावेळी जगन्नाथ लोखंडे म्हणाले की, “जगातील सर्वात चांगले संविधान भारतात आहे. संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि आरक्षण दिले आहे.
आपले संविधान टिकवण्यासाठी शंभर टक्के मतदान करणे आवश्यक आहे. संविधान वाचवले नाही तर आपला समाज मोठ्या संकटात सापडेल!” विलास थोरात यांनी संविधान उद्देशिका वाचन केले; तसेच उपस्थित सर्वांनी शंभर टक्के मतदानाचा निर्धार व्यक्त केला.

error: Content is protected !!