तळेगाव दाभाडे: माझ्या पत्रकार भगीनी चैत्राली राजापूरकर यांनी माझ्या व माझ्या सहकान्यांविरोधात लोणावळा पोल्नीस स्टेशन येथे तक्रार दिली आहे. मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी त्यांना विरोधात बातमी का दिली ? असे विचारले व २० तारखेनंतर बधून घेतो, अशी धमकी दिली. असा त्यांचा आमच्यावर आरोप आहे, त्यांनी केलेला आरोप हा पुर्णपणे खोटा असून आम्हाला तो मान्य नाही अशी स्पष्टोक्ती तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष किशोर भेगडे यांनी दिली.
येथे पत्रकार परिषदेत भेगडे बोलत होते. यावेळी बोलताना भेगडे म्हणाले, “अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना प्रचारात आघाडी व लोकांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहून महिला पत्रकार चैत्राली राजापुरकर आडून विरोधक राजकीय डाव साधून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे.
खोटा आरोप करणे, गुन्ह्यात आमची नावे टाकणे, महिला आयोगाला तक्रार करणे, माझी बाजू ऐकून न घेता काही ठिकाणी त्याच्या बातम्या छापून आणने, विरोधी कार्यकर्त्यांनी त्या व्हायरल करणे असा सगळा क्रम पहाता हा आम्हाला बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव आहे. मावळच्या मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. पराभव दिसू लागल्याने ते चांगल्या लोकांना हाताशी धरून राजकारण करत आहे.
किशोर भेगडे म्हणाले,” मी पोलीस प्रशासनाकडे दोन मागण्या केल्या आहेत. चैत्राली राजापूरकर एस.पी. ऑफिस पुणे ग्रानीण व लोणावळा शहर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आल्या होत्या त्यावेळचे CCTV फुटेज तात्काळ उपलब्ध करुन द्यावे, कारण विरोधी उमेद्वारांचे भाऊ व त्यांचे हस्तक त्यांच्या सोबत होते याची खात्रीलायक माहिती माझ्याकडे आहे.
जनतेचे अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांची बदनामी करून अधिक राजकीय फायद्याघेण्यासाठी विरोधी उमेदवार आणि त्यांचे बगलबच्चे चैत्राली राजापूरकर यांच्या जिवाचे काही बरे वाईट करू शकतात. व त्याचा आरोप आमच्यावर करून आम्हाला बदनाम करू शकतात. त्यामुळे महिला पत्रकार चैत्राली राजापूरकर यांना तातडीने पोलीस संरक्षण द्यावे हि माझी पोलीसांकडे मागणी आहे.
विरोधकांनी महिला पत्रकाराच्या आडून आमच्या विरोधात राजकीय षडयंत्र आखले आहे. माझी चैत्रालीताईंबद्दल कोणतीही तक्रार नाही, त्यांच्या तक्रारीला मी विनम्रपणे कायदेशीर उत्तर देईल पण यामागचे राजकीय मास्टरमाईड तालुक्याला ठाऊक आहे. येत्या २० तारखेला जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल.