वडगाव मावळ: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष  राज ठाकरे यांचे आदेशानुसार आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वपक्षीय पाठिंबा असलेले मावळ विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार  आण्णा उर्फ बापूसाहेब भेगडे यांना मावळ तालुका मनसेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात येत असल्याचे मावळ मनसेचे अध्यक्ष रूपेश म्हाळस्कर यांनी सांगितले.
राज ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करुन मावळ तालुक्यातील सर्व मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर सर्व संलग्न संघटना यानी निवडणूक काळात आपआपले कार्यक्षेत्रात अपक्ष उमेदवार  बाप्पुसाहेब भेगडे यांचाच प्रचार करावा व त्यांना जास्तीत जास्त मताधिक्क्याने विजयी करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही म्हाळस्कर यांनी केले.
पक्षाने दिलेल्या आदेशा व्यतिरिक्त इतर कोणत्याही उमेदवाराचा प्रचार करु नये, असे निदर्शनास आल्यास सदर पदाधिकारी किंवा कार्यकत्यांवर पक्षशिस्तभंगाची कारवाई केली जाईल. कृपया सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी नोंद घ्यावी असाही इशारा त्यांनी दिला.

error: Content is protected !!