तळेगाव दाभाडे : आमदार सुनील शेळके यांनी प्रचारादरम्यान ‘धनगर गेले आणि मेंढरं राहिली’ असे विधान करीत धनगर समाज व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अपमान केला आहे तसेच, समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. याबाबत कायदेशीर सल्ला घेऊन निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणार असल्याचे मावळ विधानसभा सर्वपक्षीय अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी सांगीतले.
बापूसाहेब भेगडे यांनी सांगितले, की आमदार शेळके यांना पराभव समोर दिसत असल्याने ते समाजात दुही माजवण्याचे काम करीत आहेत. याच नैराश्यातून त्यांनी धनगर समाजाच्या भावना दुखावतील असे वक्तव्य केले. अशी वक्तव्ये महाराष्ट्राच्या दृष्टीने घातक आहेत. धनगर समाज हा माझा परिवार आहे.
ज्या दिवशी या धनगर समाजाच्या काठीचा फटका या आमदाराला पडेल, त्यावेळी ते ताळ्यावर येतील. मतप्रवाह वेगळे असले, तरी आपण काय बोलतोय याचे भान सुनील शेळके यांना राहिलेले नाही. स्वार्थासाठी काहीही विचार करतात. अशा प्रवृत्तींना ठेचण्यासाठी आपण एकत्र आले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
- विकासकामे केली म्हणता, मग पैसे, साड्या का वाटता?
- देहूगावात विकासाच्या जोरावर सुनील शेळके यांच्या प्रचारासाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी
- आमदार सुनील शेळके यांना मोदींचा आशीर्वाद ‘विजयी भव’!
- समर्थ विद्यालयात तब्बल ४२ वर्षांनी भरला इ.१०वीचा वर्ग देश विदेशातून विद्यार्थ्यांची हजेरी
- औद्योगिक नगरीत मतदार जनजागृती अभियान