तळेगाव दाभाडे: नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी मध्ये नूतन इन्क्युबेशन सेंटर (एनआयसी) आणि इंस्टीट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल (आयआयसी) यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथम वर्षाच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी आयोजित रोबोटिक्स कार्यशाळेने विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची ओळख करून दिली.
या कार्यशाळेचे प्रमुख उद्दिष्ट विद्यार्थ्यांना रोबोटिक्स तसेच विविध इलेक्ट्रॉनिक घटकांची प्राथमिक माहिती देणे होते, ज्याचा उपयोग विद्यार्थी त्यांच्या भविष्यातील प्रकल्पांमध्ये करू शकतात.
या कार्यशाळेमध्ये १०० हुन अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग होता. कार्यशाळेच्या आयोजनामध्ये आयआयसी आणि एनआयसीच्या मार्गदर्शनाखाली तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या मार्गदर्शकांमध्ये कौशल पवार, अथर्व जगताप, आयुष चव्हाण, अथर्व चव्हाण, आणि ओम बहाले यांचा समावेश होता.
कार्यशाळेनंतर विद्यार्थ्यांनी दिलेला प्रतिसाद अत्यंत सकारात्मक होता. विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा आनंद घेतला आणि त्यांनी विविध प्रात्यक्षिक अनुभव घेतले, जे त्यांच्या नियमित व्याख्यानांपेक्षा वेगळे आणि अधिक ज्ञानवर्धक ठरले. या कार्यशाळेच्या माध्यमातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थी त्यांच्या आगामी प्रकल्पांमध्ये नक्कीच करतील आणि त्यांना भविष्यात खूपच मदत होईल.
एनआयसीचे सीईओ मुजाहिद शेख, आयआयसी संयोजक डॉ. एम. के बिरादार, आयआयसी समन्वयक प्रा. नीलिमा बावणे,यांनी कार्यशाळेचे नियोजन केले. तर प्राचार्य डॉ. एस.एन.सपली यांनी मार्गदर्शन केले.
- विकासकामे केली म्हणता, मग पैसे, साड्या का वाटता?
- देहूगावात विकासाच्या जोरावर सुनील शेळके यांच्या प्रचारासाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी
- आमदार सुनील शेळके यांना मोदींचा आशीर्वाद ‘विजयी भव’!
- समर्थ विद्यालयात तब्बल ४२ वर्षांनी भरला इ.१०वीचा वर्ग देश विदेशातून विद्यार्थ्यांची हजेरी
- औद्योगिक नगरीत मतदार जनजागृती अभियान