पवनानगर : दिवाळीच्या  सणासुदीत विधानसभा  निवडणूकीची धामधूम सुरू असतानाच  महागावच्या सावंतवाडीत तरुणाचा धारदार हत्यार व दगडाने ठेचून खून केल्याची घटना शुक्रवारी (ता.१)(प्रभाचीवाडी) महागाव ता.मावळ जि.पुणे हद्दीत घडली.
निलेश दत्तात्रय कडू वय 30 रा.सावंतवाडी महागाव ता.मावळ असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.लहु रामभाउ कडु  यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.  अक्षय बाबु घायाळ वय २८  वर्षे रा. सावंतवाडी ता मावळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘” गुरूवार ता. ३१ ला रात्री  प्रभाचीवाडी ता मावळ जि पुणे गावचे हद्दीत प्रभाचीवाडी फाट्याचे जवळ विजय मारणे यांच्या जमीनीत  दगडी डबराचे जवळ अक्षय बाळु घायाळ रा. सावंतवाडी, पियुश विश्वनाथ डोंगरे व साहिल साईनाथ जाधव दोघे रा. प्रभाचीवाडी ता. मावळ  व मयत निलेश दत्ताञय कडु वय 32 वर्षे रा. सावंतवाडी  हे दारु पिण्यासाठी एकञ बसलेले असताना यातील आरोपी अक्षय घायाळ हा पियुश डोंगरे यास गाडीवर बसवुन त्याचे घरी जावुन येतो असे सागुन तेथुन निघुन गेले.
काही वेळानंतर परत येवुन आरोपी अक्षय घायाळ याने कोणत्यातरी कारणाने त्याचे हातात असलेल्या कसल्यातरी हत्याराने मयत निलेश कडु यास डोक्यात वार करुन व दगडाने ठेचुन गंभीर जखमी करून त्यास जिवे ठार मारले आहे.
लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार ,” ही घटना गुरुवारी (ता.३१) रात्री घडली असून शुक्रवारी (ता.१) सकाळी ७ वाजता उघडकीस आली आहे. मयत हा भाजप विद्यार्थी पदाधिकारी होता.घटनेची माहिती मिळताच लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मायने, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ व पोलीस अंमलदारांनी घटनास्थळी पोहोचले मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदन करण्यात आले.  पुढील तपास लोणावळा पोलीस करीत आहेत.

.

error: Content is protected !!