लोणावळा: कैवल्यधाम योग संस्था लोणावळा आणि आयुष मंत्रालय, भारत सरकार यांच्या द्वारा समर्थित “ योगकला महोत्सव उत्साहात साजरा झाला.शताब्दी वर्षाचे औचित्य साधून आयोजन करण्यात आले होते. योगकला महोत्सवामध्ये खुल्या वर्गासाठी “पाककला स्पर्धा” आणि 15 वर्षा आतील व 15 वर्षा वरील स्पर्धकांसाठी योगासनांवर आधारित “नृत्य कला स्पर्धा” यांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात शांतीपाठाने करण्यात आली. प्रमुख पाहुण्या लोणावळा नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या शुभहस्ते कैवल्यधाम संस्थेचे मानद सचिव व प्रमुख कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी, कैवल्य विद्या निकेतन शाळेचे संचालक एन.डी.जोशी व प्राचार्या भारती कावडे तसेच कैवल्यधाम कोर कमिटीचे सदस्य निशांत जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत दिपप्रज्वलन करून योगकला महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
कैवल्य विद्या निकेलेन, कैवल्यधाम, लोणावळा शाळेच्या प्राचार्या भारती कावडे यांनी स्वागतपर भाषण केले. कैवल्यधाम कोर कमिटीचे सदस्य निशांत जैन यांनी प्रमुख पाहुण्या लोणावळा नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा यांचा शाल आणि योग प्रतिमा देऊन सत्कार केला. तसेच कैवल्य विद्या निकेतन शाळेच्या प्राचार्या भारती कावडे यांनी कैवल्यधाम संस्थेच्या निसर्गोपचार विभागाच्या डॉक्टर व “सात्विक आहार” पुस्तकाच्या लेखिका रितु प्रसाद यांना सन्मानित केले.
15 वर्षाखालील आणि 15 वर्षाखालील स्पर्धकांचे नृत्य सादरीकरण झाले. प्रमुख पाहुणे सुरेखा जाधव यांनी स्पर्धकांचे कौतुक केले आणि कैवल्यधाम संस्थेच्या शताब्दी वर्षास शुभेच्छा दिल्या यांनी उपस्थितांना संबोधित केले.
दोन्ही स्पर्धांचे परीक्षण केल्यानंतर प्रमुख पाहुणे लोणावळा नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा श्रीमती सुरेखा जाधव आणि कैवल्यधाम संस्थेच्या कोर कमिटीचे सदस्य श्री निशांत जैन यांच्या शुभ हस्ते विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धांमधील विजेत्यांची नावे पुढील प्रमाणे :
पाक कला : 1. आरती शिंदे 2. सौ. नीलम गुरव 3. उर्मिला शर्मा
नृत्य कला : 1. रियल रॉकर्स ग्रुप 2. इंद्रायणी स्पोर्ट्स एकेडमी
उत्तेज्नांर्थ पारितोषिक : डीवाईन लाइफ ग्रुप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालेय शिक्षिका डिम्पल प्रधान यांनी केले आणि आभार प्रदर्शन निकिता बुध्दीसागर यांनी केले. शांती पाठाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
- शिवराज पॅलेस ‘ बँक्वेट हाॅलचे सीता खंडू वायकर व खंडू आबाजी वायकर यांच्या हस्ते उद्घाटन
- महागाव येथे कालाष्टमी व श्री. काळभैरवनाथ जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
- इंदोरीत शनिवार दि.२३ नोव्हेंबरला समाजप्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख यांचे किर्तन
- रविवार, २४ नोव्हेंबर रोजी गझलपुष्पचा वर्धापनदिन सोहळा : रविंद्र भेगडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
- संपतराव पांडुरंग गराडे यांचे निधन