वडगाव मावळ:ग्रामीण भागात अल्प दरात प्रगत शिक्षण उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि स्पर्धात्मक युगात आपल्या बहुमोल योगदानातून शैक्षणिकतेचा दर्जा उंचावल्याबद्दल इंदुरी येथील चैतन्य इंटरनॅशनल (सी.बी.एस. ई) स्कूलला (IKA)  आयका 2024 पुणे या पुरस्काराने गौरवपूर्वक सन्मानित करण्यात आले.
एलड्रोक इंडिया अंतर्गत फुर्ताडोस स्कूल ऑफ म्युझिकच्या वतीने इंडिया के-12 हा देण्यात आलेला सन्मान चैतन्य स्कूलचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव शेवकर यांनी स्वीकारला. शालेय दृष्टिकोनातून चैतन्य स्कूलने याआधी बहुतांश पारितोषिके व पुरस्कार मिळवले असून महाराष्ट्र स्कूल मेरिट अवॉर्डनेही संस्थेला सन्मानित करण्यात आले आहे.
          विद्यार्थ्यांना बालवयापासूनच शैक्षणिकतेच्या माध्यमातून शालेय ज्ञान मार्गदर्शक ठरते. त्याच करिता इंदोरी येथील चैतन्य इंटरनॅशनल (सी.बी.एस.ई) स्कूलने विद्यार्थ्यांच्या वार्षिक अभ्यासक्रमांमध्ये गुणात्मक धोरण आखून शैक्षणिक कार्य सुरू ठेवले आहे. त्यामध्ये रोबोटिक,अबॅकस,मल्लखांब,म्युझिक,आर्ट,योगा, मेडिटेशन यासह शालेय व  शाळाबाह्य विविध खेळांचा अंतर्भाव केला आहे.
     विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक ते बरोबर त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देण्याकरिता आणि गुणात्मक शिक्षण अल्प दरात देण्याकरिता चैतन्य चॅरिटेबल ट्रस्ट कटिबद्ध असल्याचे यातून दिसून येते.

error: Content is protected !!