डगाव मावळ: कल्हाट ता.मावळ येथील जावेद मगबुल मुलाणी यांची ऑल इंडिया ह्यूमन राईटस् (मानवाधिकार)असोसिएशनच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी  निवड करण्यात आली.ऑल इंडिया अध्यक्ष परवेज आलम खान  यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष शकीलभाई मुलाणी यांनी ही निवड केली.
जावेद मुलाणी यांनी कल्हाट ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच म्हणून काम केले आहे  मुलाणी कल्हाट गावचे  आहेत. आपल्या सामाजिक कार्यातून त्यांनी आपल्या नावाची एक वेगळी ओळख निर्माण केली.युवा उद्योजक म्हणून ते तरुण पिढीत लोकप्रिय आहे. व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी उद्योजक आहेत.
प्रेमळ, सुस्वभावी, आणि प्रामाणिक पणाच्या जोरावर  त्यांना कल्हाट गावच्या  उपसरपंच पदाचा मान  मिळाला आहे.राजकारणाला सामाजिक कार्याची जोड देत त्यांनी अनेक माणसे जोडली.याच  योगदानातून त्यांनी अनेक समाजपयोगी कामे केली आहेत.सामान्य जनतेसाठी तालुक्यातील तसेच गावातील लोकांसाठी त्यांचे  मोठे योगदान आहे.या निवडीतून जिल्ह्यातील गोर गरीब जनता,तसेच माता भगिनी,कामगार,विद्यार्थी,यांच्यासाठी मदतीचा हात म्हणून सामाजिक कार्य करण्याचा त्यांनी मानस व्यक्त केला आहे.
निवडीचे पत्र वडगाव-मावळ चे पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक कुमार कदम यांच्या हस्ते स्वीकारण्यात आले.या वेळी खोपडे साहेब ,कल्हाट गावचे माजी सरपंच संतोष जाचक, तंटामुक्ती अध्यक्ष कैलास करवंदे, कशाळ गावचे तंटामुक्ती अध्यक्ष नवनाथ जाधव, माजी उपसरपंच ज्ञानेश्वर जाधव, उपसरपंच सुभाष जाधव, सामाजिक कार्यकर्ते- दत्ता कल्हाटकर,ज्ञानेश्वर कल्हाटकर, बाळू जाधव, सुनिल जाधव उपस्थित होते.
जावेद मुलाणी म्हणाले, ‘महिलांचा होणारा कौटुंबिक छळ थांबवणे.कंपनीतील कामगार, बांधकाम क्षेत्रातील कामगार वर्ग यांची होणारी पिळवणूक थांबवणे यावर काम करणार आहे. गोरगरिबांना शासकीय कामात येणारे अडथळे मार्गी लावणे.धनदांडग्यापासून शेतकऱ्यांना होणारा त्रास, चुकीच्या पद्धतीने होणारी शासकीय कामे,स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये नागरिकांची होणारी गैरसोय, गोर गरीब आदिवासी बांधव यांना येणाऱ्या अडचणी मार्गी लावणे.रुग्णालयामध्ये होणारी सामान्य नागरिकांची लूट थांबवणे अशी समाजपयोगी कामे केली जातील.

error: Content is protected !!