.

साते मावळ : येथे पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटीच्या फार्मसी विभागाने फार्म टेकफेस्ट २०२४ साजरा केला. “पीसीयु फार्मऔरा २०२४” च्या अंतर्गत विविध स्पर्धा आयोजित करण्यात आले.
या सर्व स्पर्धा तांत्रिक स्वरूपाच्या होत्या. महाराष्ट्रातून विविध फार्मसी महाविद्यालयातून पदवी आणि पदविकाच्या एकूण ६६ टीम ने सहभाग नोंदविला होता. यामध्ये फार्मा मॅड-ऍड , मॉडेल मेकिंग, पोस्टर प्रेझेंटेशन आणि व्हिडिओ मेकिंग स्पर्धा घेण्यात आल्या.
परीक्षणासाठी डॉ. राहुल डुंबरे, डॉ. बसवराज मठदेवरु आणि डॉ. गणेश म्हस्के याना निमंत्रित केले होते. प्राचार्य डॉ. राजेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन  प्रा. मयुरेश राऊत आणि प्रा. राहुल जाधव यांनी केले.
विविध स्पर्धांच्या नियोजनाची जबाबदारी डॉ. सागर कोरे,डॉ. सविता देवकर, प्रा. हर्षदा पुराणिक, प्रा. दीपाली व्हनकडे प्रा.दीक्षिता पाटील,प्रा. आकांचा कुमारी, प्रा. अंकिता जटाले यांनी पार पाडली.
पिंपरी चिंचवड एजुकेशन ट्रस्ट चे सर्व विश्वस्त आणि संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, उप कुलगुरू डॉ. मणिमाला  पुरी, प्र. कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे यांनी मार्गदर्शन केले.

.

error: Content is protected !!