तळेगाव दाभाडे: शहरातील श्री विठ्ठल मंदिरांमध्ये काकड आरती सोहळा अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये सुरू झाला असून भाविकांची सकाळीच पांडुरंगाच्या दर्शनासाठी व काकड आरती साठी गर्दी होत आहे
शाळा चौकातील श्री विठ्ठल मंदिरामध्ये पहाटेपासून काकड आरती सोहळ्यास अतिशय भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली पहाटे उद्योजक सिद्धार्थ शिवाजीराव भेगडे व संभाजी भेगडे परिवाराच्या वतीने अभिषेक महापूजा करण्यात आली .काकड आरती भजन महाआरती होऊन भक्तिमय वातावरणामध्ये कार्यक्रम संपन्न झाला.मंदिरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली होती
काकड आरती सोहळ्यानिमित्ताने मंदिरामध्ये अतिशय आकर्षक अशी रांगोळी काढण्यात आली आहे.तसेच विद्युत रोषणाई ही करण्यात आली आहे. या काकड आरती सोहळ्याचे आयोजन विठ्ठल मंदिर संस्थांचे विश्वस्त ह भ प बाळकृष्ण आरडे यतीन भाई शहा ह भ प नथुराम महाराज जगताप पाटील दिनेश दरेकर प्रकाश सरोदे सुभाष बेल्हेकर निवृत्ती फाकटकर पांडुरंग गदादे प्रशांत दाभाडे श्याम भेगडे शेखर गुंड अतुल देशपांडे निशा शेळके यांनी केले होते.
- शिवराज पॅलेस ‘ बँक्वेट हाॅलचे सीता खंडू वायकर व खंडू आबाजी वायकर यांच्या हस्ते उद्घाटन
- महागाव येथे कालाष्टमी व श्री. काळभैरवनाथ जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
- इंदोरीत शनिवार दि.२३ नोव्हेंबरला समाजप्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख यांचे किर्तन
- रविवार, २४ नोव्हेंबर रोजी गझलपुष्पचा वर्धापनदिन सोहळा : रविंद्र भेगडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
- संपतराव पांडुरंग गराडे यांचे निधन