लोणावळा: येथील जगववख्यात कैवल्यधाम योग संस्थेत १८ व १९ ऑक्टोबरला indian Yoga Association आणि Ministry of Ayush, Government of India द्वारा स्थापित “Yoga an Instrument for Cultural Symphony” ( योग- सांस्कृतिक समन्वयाचे एक साधन ) या विषयावर राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
कैवल्यधाम योग संस्था २०१४ साली शतकपूती करीत आहे. याचे औचित्य साधीत या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शुक्रवार ता.१८ला उद्घाटन करण्यात आले.शांतीपाठाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यानंतर Eminence Chokyoung Palga Rinpoche- Naliorling Monastery, लेह, भारत,जम्मू आणि काश्मीर स्वामी विश्वेश्वरानंद जी, अध्यक्ष सुरतचंद्रजी,बांग्ला, हररद्वार व अध्यक्ष सन्यास आश्रम, मुंबई, मां डॉ. हंसाजी योगेंद्र – अध्यक्ष, योग संस्थान,मुंबई, आचार्य लोकेश मुनी जी – संस्थापक, अध्यक्ष, डॉ.सत्यपाल ससंग, माजी संसद सदस्य, सुरेश प्रभू , अध्यक्ष कैवल्यधाम शताब्दी वषय समिती केंद्रीय कॅबबनेट मंत्री, तसेच कैवल्यधाम संस्थेचे अध्यक्ष डॉ. ओम प्रकाश तिवारी, सुबोध तिवारी यांच्या प्रमुख उपस्थित दीपप्रज्वलन करून काययक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
कैवल्यधाम संस्थेचे अध्यक्ष डॉ.ओम प्रकाश तिवारी यांनी स्वागतपर भाषण केले. डॉ. रजनी प्रधान यांनी व्यासपीठावरील अध्यात्म गुरूंचा परिचय करून दिला.सुबोध तिवारी यांनी त्यांना शाल, कैवल्यधाम शताब्दी वर्षाची मुद्रा तसेच Biography of Swami Kuvalayananda हे पुस्तक देऊन सन्मातनत केले.कैवल्यधाम शताब्दी वर्षाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कॅबिनेट मंत्री सुरेश प्रभू यांनी मनोगत व्यक्त केले. कैवल्यधाम संस्थेचा १०० वर्षाचा प्रवास माहितीपटात दाखववण्यात आला. डॉ.सत्यपाल यांचे भाषण झाले. आचार्य लोकेश मुनी यांनी आशीर्वाद पर भाषण केले.कैवल्यधाम संस्थेच्या शताब्दी वर्षात राबविण्यात आलेल्या कार्यक्रमाची चित्रफित दाखविण्यात आली. डॉ. हंसा जी योगेंद्र यांनी उद्घाटनपर भाषण केले. तसेच स्वामी विश्वेश्वरानंद यांनी संबोधित केले.
- शिवराज पॅलेस ‘ बँक्वेट हाॅलचे सीता खंडू वायकर व खंडू आबाजी वायकर यांच्या हस्ते उद्घाटन
- महागाव येथे कालाष्टमी व श्री. काळभैरवनाथ जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
- इंदोरीत शनिवार दि.२३ नोव्हेंबरला समाजप्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख यांचे किर्तन
- रविवार, २४ नोव्हेंबर रोजी गझलपुष्पचा वर्धापनदिन सोहळा : रविंद्र भेगडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
- संपतराव पांडुरंग गराडे यांचे निधन