तळेगाव दाभाडे: मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मावळ विधानसभेच्या उमेदवारीची मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधानसभेची उमेदवारी द्यावी करावी, अशी मागणी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी केली.
येथे झालेल्या पत्रकार परिषदेत भेगडे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाष्य केले. निमित्त होते,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोटातून भेगडे यांची महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचा उपाध्यक्ष पदी निवड केली.या विषयी खुलासा करताना भेगडे यांनी आपली भूमिका मांडली.
बापूसाहेब भेगडे म्हणाले, ” गेली पस्तीस वर्षे मी तालुक्याच्या राजकारणात सक्रिय आहे. नगरसेवक, उपनगराध्यक्ष म्हणून काम केले. २००९ला विधानसभा निवडणूक लढवली.पक्ष संघटन आणि कार्यकर्ते यांना ताकद देण्याचे काम केले. प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उपाध्यक्ष म्हणून काम करतोय.
भेगडे पुढे म्हणाले,” राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचा उपाध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती केल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून मला समजले आहे. या पदाची मी कोणत्याही प्रकारची मागणी अथवा अर्ज केला नव्हता, तरीही मला पक्षाने जे पद दिले आहे ते मला मान्य नाही. मला त्या पदावर कोणत्याही प्रकारचा काम करण्याचा रस नाही. मी हे पद स्वीकारणार नाही.
भेगडे आपली राजकीय पार्श्वभूमी मांडताना पुढे म्हणाले, “मी राष्ट्रवादी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता असून गेली ३५ वर्ष राजकीय, सामाजिक कार्यात सक्रिय असून गेली ३० वर्ष तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा नगरसेवक ते उपनगराध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.तसेच पुणे महानगर नियोजन समितीवर देखील काम केले आहे. गेली १० वर्ष श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पदही सांभाळले आहे.
मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मावळ विधानसभेच्या उमेदवारीची मागणी केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी माझी मावळ विधानसभेची उमेदवारी जाहीर करावी. येत्या काळात मी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेऊन माझी पुढील भूमिका स्पष्ट करेल.
या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष बबनराव भेगडे, कृषी पशुसंवर्धनचे माजी सभापती बाबूराव वायकर, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष सचिन घोटकुले, संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक सुभाषराव जाधव यांच्या सह शहर व ग्रामीण भागातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
- शिवराज पॅलेस ‘ बँक्वेट हाॅलचे सीता खंडू वायकर व खंडू आबाजी वायकर यांच्या हस्ते उद्घाटन
- महागाव येथे कालाष्टमी व श्री. काळभैरवनाथ जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
- इंदोरीत शनिवार दि.२३ नोव्हेंबरला समाजप्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख यांचे किर्तन
- रविवार, २४ नोव्हेंबर रोजी गझलपुष्पचा वर्धापनदिन सोहळा : रविंद्र भेगडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
- संपतराव पांडुरंग गराडे यांचे निधन